भारतात जिओच्या 4जीचा स्पीड सर्वात कमी : ट्राय

रिलायन्स जिओचे सिम कार्ड घेण्याचा विचार असेल तर हे जरुर वाचा. ट्रायच्या नुकत्याच रिपोर्टनुसार इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत जिओच्या 4जी सर्व्हिसचा स्पीड सर्वात कमी असल्याची माहिती समोर आलीये.

Updated: Oct 21, 2016, 12:08 PM IST
भारतात जिओच्या 4जीचा स्पीड सर्वात कमी : ट्राय title=

नवी दिल्ली : रिलायन्स जिओचे सिम कार्ड घेण्याचा विचार असेल तर हे जरुर वाचा. ट्रायच्या नुकत्याच रिपोर्टनुसार इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत जिओच्या 4जी सर्व्हिसचा स्पीड सर्वात कमी असल्याची माहिती समोर आलीये.

ट्रायच्या रिपोर्टनुसार, एअरटेलचा स्पीड सर्वाधिक आहे. या यादीत एअरटेल अव्वल स्थानी, त्यानंतर अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स दुसऱ्या स्थानी, तिसऱ्या स्थानी आयडिया, चौथ्या स्थानी वोडाफोन आणि पाचव्या स्थानी जिओचा नंबर लागतो.
 
एअरटेलचा स्पीड 11.4 एमबीपीएस आहे. त्यापाठोपाठ अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सचा स्पीड 7.9 एमबीपीएस, आयडियाचा स्पीड 7.6 एमबीपीएस आणि वोडाफोनचा 7.3 एमबीपीएस आहे. जिओचा स्पीड केवळ 6.2 एमबीपीएस इतका आहे.