जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनची 4जी मोफत डाटा ऑफर

मोबाईल कंपन्यांमध्ये सध्या ४जीची स्पर्धा दिसून येत आहे. रिलायन्स जिओने ४ जीकडे ग्राहक आकर्षित होण्यासाठी  'हॅप्पी न्यू ईअर' या नावाने मोफत इंटरनेट डेटा, कॉलिंग सुविधा सुरु केली. आता या स्पर्धेत व्होडाफोन ही कंपनी उतरली आहे. व्होडाफोन ग्राहांना ४जी डाटा मोफत देणा आहे.

Updated: Dec 4, 2016, 10:15 AM IST
जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनची 4जी मोफत डाटा ऑफर title=

मुंबई : मोबाईल कंपन्यांमध्ये सध्या ४जीची स्पर्धा दिसून येत आहे. रिलायन्स जिओने ४ जीकडे ग्राहक आकर्षित होण्यासाठी  'हॅप्पी न्यू ईअर' या नावाने मोफत इंटरनेट डेटा, कॉलिंग सुविधा सुरु केली. आता या स्पर्धेत व्होडाफोन ही कंपनी उतरली आहे. व्होडाफोन ग्राहांना ४जी डाटा मोफत देणा आहे.

व्होडाफोन कंपनी ४जी ट्रॉयल ऑफर ग्राहकांना देण्यासाठी योजना आखत आहे. जेणेकरुन व्होडाफोनच्या माध्यमातून अधिकाधिक ग्राहक खेचण्याचा प्रयत्न आहे.

आपण व्होडाफोनचे ग्राहक आहेत तर ४जीवर अपग्रेड होण्यासाठी तुम्हाला १० दिवस अनलिमिटेड ४जी स्पीडसोबत २ जीबी डेटा मिळणार आहे.

व्होडाफोन हा डेटा ग्राहकांना मोफत उपलब्ध करणार आहे. जेणेकरुन लोक ४जीवर स्वीच होतील.

मात्र, ही ऑफर व्होडाफोन युजर्ससाठी कंपनीने निवडलेल्या शहरांतच मिळणार आहे. तसेच आपण एक एसएमएस पाठवून व्होडाफोन सिममध्ये डेटा प्राप्त करु शकता.