www.24taas.com, झी मीडिया, मुंबई (वृत्तसंस्था)
म्हणता म्हणता आता पावसाळाही संपत आलाय. म्हणजेच आता थंडीच्या दिवसांचेही वेध लागलेत. काहींणी तर थंडीच्या दिवसांत कुठे कुठे फिरायला जाता येईल, याचीही आखणी करायची सुरुवात केलीय. फिरायला जाणार म्हणजे फोटो आलेच... आणि फोटो आले म्हणजे आपला ट्रेंडी लूक तर त्यात दिसायलाच हवा... नाही का!
चला, तर मग आज पाहुयात हिवाळ्यात तुमचा लूक कसा ट्रेंडी दिसू शकेल ते...
खरेदी करताना आपल्याला नवीन आणि नवीन ट्रेंडमध्ये असलेल्या वस्तू हव्या असतात. सध्या तर ऑफिसमध्ये काम करताना साधे, सुटसुटीत पण रिच लूक देणारे कपडे हवे असतात. त्यातच कूल सिझनमध्ये लूक कूल हवाच पण थंडीपासून संरक्षणही झालं पाहिजे. मग, त्यासाठी आपला जो काही पेहराव असेल त्यावर एखादं स्मार्ट जॅकेट चढवायचं. जीन्स, शर्ट आणि त्यावर जॅकेट हा स्मार्ट लूक तर कॉमन आहेच.
टी-शर्टवर शॉर्ट स्लीव्हजचा शर्ट ही फॅशनही स्टेटेड आहे. पण या लूकला तुम्ही स्वत:चा टच दिलात तर एक त्याला एक वेगळं परिमाण मिळू शकतं. म्हणजे फूल स्लीव्हज असणाऱ्या शर्टवर स्लीव्हलेस शर्ट जॅकेटप्रमाणे घालू शकता.
तसेच लाँग शर्टवर डेनिम जॅकेट घातलं आणि खाली सलवार घातली तर एक झक्कास पठाणी लूकही मिळू शकेल.
आजकाल लो बजेटमध्ये स्टायलिंग जॅकेटसही मिळतात. साडीवरच्या ब्लाऊजइतक्या आकाराची ही जॅकेट एकदम हॉट लूक देतात.
फुल लेंग्थ शर्टवर व्ही नेक पुलओव्हर चढवल्यावर युरोपियन स्टाइल टच मिळू शकेल. पंजाबी ड्रेसवर ओढणीऐवजी कुठचंही जॅकेट घातलं तरी खुलून दिसेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.