प्रेमात पडल्यावर मुलींमध्ये होतात हे ५ बदल

प्रेम ही नकळत घडणारी गोष्ट आहे. प्रेम कधी होईल काही सांगू शकत नाही. प्रेमात पडल्यानंतर सर्वच काही छान छान वाटू लागते. मात्र प्रेमात पडलेल्या माणसांमध्ये लगेचच बदल जाणवू लागतात. प्रेमात पडल्यावर मुली किती बदलतात ते घ्या जाणून

Updated: Aug 17, 2016, 01:05 PM IST
प्रेमात पडल्यावर मुलींमध्ये होतात हे ५ बदल title=

मुंबई : प्रेम ही नकळत घडणारी गोष्ट आहे. प्रेम कधी होईल काही सांगू शकत नाही. प्रेमात पडल्यानंतर सर्वच काही छान छान वाटू लागते. मात्र प्रेमात पडलेल्या माणसांमध्ये लगेचच बदल जाणवू लागतात. प्रेमात पडल्यावर मुली किती बदलतात ते घ्या जाणून

प्रेमात पडल्यावर मुलींमध्ये होतात हे ५ बदल

१. प्रेमात पडल्यानंतर मुली फार कमी झोपतात. त्यांची झोप कमी होते. रात्री उशिरापर्यंत फोनवर बोलणे तसेच चॅटिंग करणे सुरु होते.

२. प्रेमात पडल्यानंतर आरशात वारंवार पाहण्याचे प्रमाण वाढते. सतत चांगले दिसण्याकडे आपला कटाक्ष असतो. आरशात जाऊन मनातल्या मनात हसणे हे प्रकार वाढतात.

३. जोपर्यंत मुली प्रेमात नसतात तोपर्यंत त्यांच्या मोबाईल लॉक नसते मात्र प्रेमात पडल्यानंतर त्या त्यांचा मोबाईल कोणाच्याही हातात द्यायला तयार नसतात. सतत मोबाईल पाहण्याची सवय वाढते. 

४. सतत रोमँटिक गाणी ऐकावीशी वाटतात. रोमँटिक चित्रपट पाहिले जातात.

५. बॉयफ्रेंडला काय आवडेल याचा सतत विचार करतात.