मुंबई: सॅमसंगनं आपला नवा गॅलेक्सी टॅबलेट मार्केटमध्ये लॉन्च केलाय. कंपनीनं अतिशय गुप्तपणे गॅलेक्सी टॅब A9.7 नावानं लिस्ट केलाय. युजर्स हे टॅब ऑनलाइनसोबतच रिटेल स्टोअरमधूनही विकत घेऊ शकतात. याची किंमत 399 यूरो म्हणजे जवळपास 23,750 रुपये आहे.
कंपनीनं या नव्या टॅबसोबत ग्राहकांना वन ड्राइव्हवर 2 वर्षांसाठी 100जीबी फ्री स्टोरेज मिळेल, यासोबतच टॅबसह आपल्याला स्टायलिस पेन पण मिळेल. जो की या टॅबला आणखीच प्रिमियम बनवतं.
गॅलेक्सी ए 9.7 टॅबच्या स्पेसिफिकेशन्स
- जसं की नावावरून कळतं या टॅबचा डिस्प्ले 9.7 इंचाचा आहे.
- रिझॉल्यूशन 1024X768 पिक्सेल आहे.
- अँड्रॉईडचं 5.0 लॉलिपॉप ऑपरेटिंग सिस्टिम आहे.
- प्रोसेसर 1.2 GHz क्वाड कोर, 2 जीबी रॅम
- इंटरनल मेमरी 16 जीबी जी की मायक्रो एसडीच्या मदतीनं 128 जीबीपर्यंत वाढवू शकतो.
- 6000 mAhची बॅटरी
- 5 मेगापिक्सेल रिअर कॅमरा, 2 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi सपोर्टिव्ह, ब्लूटूथ, NFC आणि मायक्रो -यूएसबी सारखे ऑप्शन्स आहेत.
- 4जी सपोर्टिव्ह पहिला टॅब
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.