असा 'पासवर्ड' जो कधीच 'हॅक' होत नाही

जगभरात इंटरनेटचा वापर वाढला आहे, यासोबत इंटरनेटवरील आर्थिक व्यवहारही वाढले आहेत, या सर्व गोष्टींसाठी पासवर्ड महत्वाचा ठरतो, अनेक वेळा पासवर्ड हॅक झाल्याने अडचणी येतात, याचा आर्थिक फटकाही बसू शकतो.

Updated: Jul 27, 2015, 03:35 PM IST
असा 'पासवर्ड' जो कधीच 'हॅक' होत नाही title=

मुंबई : जगभरात इंटरनेटचा वापर वाढला आहे, यासोबत इंटरनेटवरील आर्थिक व्यवहारही वाढले आहेत, या सर्व गोष्टींसाठी पासवर्ड महत्वाचा ठरतो, अनेक वेळा पासवर्ड हॅक झाल्याने अडचणी येतात, याचा आर्थिक फटकाही बसू शकतो.

तुमचा पासवर्ड सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे, यासाठी काही महत्वाचे उपाय आहेत.

एकच पासवर्ड एकापेक्षा जास्त वेबसाईट अथवा बँक अकाऊंटना वापरू नका, नाहीतर एक कुलूप उघडल्यावर सर्वच दरवाजे उघडतील.

चुकूनही १२३४५६, ००००, २४६८ किंवा WXYX असा पासवर्ड वापरू नका, कोणताही हॅकर हा पासवर्ड सर्वात आधी हॅक करण्यासाठी वापरतो, आणि अनेक वेळा ते यशस्वी देखिल होतात.

पत्नी, मुलं, अपार्टमेंट, फेव्हरेट फुटबॉल क्लू यांची नाव टाकू नको, कारण निरीक्षणातून या गोष्टी शोधून काढल्या जातात.

जेवढा मोठा पासवर्ड असेल, तेवढा तो सुरक्षित असतो, पासवर्डमध्ये एक-दोन कॅरेक्टर कॅपिटल असावं. इंग्रजी शब्दाशिवाय तुम्ही त्यात इतर भाषेतील अक्षरं टाकाला तर तो पासवर्ड अधिक सुरक्षित होऊ शकतो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.