...रेकॉर्डब्रेक विक्री करत या बाईकनं घेतला भारताचा निरोप!

वाहन निर्मितीच्या क्षेत्रातल्या 'हिरो मोटो कॉर्प' या कंपनीनं देशातील सगळ्यात जास्त विक्रिचा रेकॉर्ड बनवणाऱ्या 'स्प्लेंडर एनएक्सजी' या बाईकचं उत्पादन भारतात बंद केलंय.

Updated: Feb 4, 2015, 02:18 PM IST
...रेकॉर्डब्रेक विक्री करत या बाईकनं घेतला भारताचा निरोप! title=

नवी दिल्ली : वाहन निर्मितीच्या क्षेत्रातल्या 'हिरो मोटो कॉर्प' या कंपनीनं देशातील सगळ्यात जास्त विक्रिचा रेकॉर्ड बनवणाऱ्या 'स्प्लेंडर एनएक्सजी' या बाईकचं उत्पादन भारतात बंद केलंय.

कंपनीनं आपल्या 'एचएमसीएल' वेबसाईटवरूनही 'स्प्लेंडर एनएक्सजी' ही बाईक हटवलीय. कारण, स्प्लेंडर एनएक्सजीची जागा आता जास्त अॅडव्हान्स बाईक स्प्लेंडर आयस्मार्टनं घेतलीय.

हिरो होंडानं 1994 मध्ये स्प्लेंडर ही बाईक पहिल्यांदा बाजारात सादर केली होती. लॉन्चिंगनंतर 6 वर्षांतच या बाईकनं देशातच नाही तर जगभरात सगळ्यात जास्त विक्रीचा रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवला. 

कंपनीनं 2007 मध्ये हिरो होंडा स्प्लेंडर एनएक्सजी व्हर्जन लॉन्च केलं होतं. युवा वर्गाला आकर्षित करण्यासाठी ही बाईक स्पोर्टी लूकमध्ये सादर करण्यात आली होती. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.