गूगल अँन्ड्रॉईडचं 'लॉलीपॉप' यूझर्सना नकोसं...

नवं गूगल अँन्ड्राईड ऑपरेटिंग सिस्टम लॉन्च होऊन आता तीन महिने झालेत. पण, आत्तापर्यंत फक्त 1.6 टक्के डिव्हाईसमध्ये 5.0.2 लॉलीपॉप अपडेट करण्यात आलंय. 

Updated: Feb 4, 2015, 09:39 AM IST
गूगल अँन्ड्रॉईडचं 'लॉलीपॉप' यूझर्सना नकोसं...   title=

नवी दिल्ली : नवं गूगल अँन्ड्राईड ऑपरेटिंग सिस्टम लॉन्च होऊन आता तीन महिने झालेत. पण, आत्तापर्यंत फक्त 1.6 टक्के डिव्हाईसमध्ये 5.0.2 लॉलीपॉप अपडेट करण्यात आलंय. 

गूगलनंच ही माहिती जाहीर केलीय. आत्तापर्यंत केवळ 2 टक्के डिव्हाईसमध्ये लॉलिपॉपचं लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करण्यात आल्याचं यात म्हटलंय.

गूगल डेव्हलपर ब्लॉगपोस्टनुसार, '4.4 किटकॅट' लॉन्च होऊन बराच काळ झाल्यानंतरही केवळ 39 टक्के डिव्हाईसमध्ये ते अपडेट करण्यात आलंय. यामध्ये, जेलीबिन अँन्ड्राईड व्हर्जन आत्तापर्यंतचं सर्वात जास्त लोकप्रिय व्हर्जन ठरलंय. जेलिबीनची तीन व्हर्जन आत्तापर्यंत 44.4 टक्के अँन्ड्रॉईड डिव्हाईसमध्ये अपडेट आहेत.

गूगलचे अपडेटेड व्हर्जन नेहमीच एक समस्या ठरलेत. याचं कारण म्हणजे, गूगल जेव्हा जेव्हा नवीन अपडेटेड व्हर्जन समोर आणतं तेव्हापर्यंत युझर्स आपल्या पहिल्या व्हर्जनशी नुकतेच रुळू लागलेले असतात. त्यामुळे, त्यांना सहजा सहजी आपलं जुनं व्हर्जन सोडायचं नसतं... आणि 5.0.2 लॉलिपॉप अपग्रेडेबल बनवलं गेलं असलं तरी ते अजून सगळ्याच हॅन्डसेटमध्ये अपडेट केलं गेलं नाही. 

यापेक्षा उलट, 'आयओएस 8' आत्तापर्यंत 69 टक्के डिव्हाईसमध्ये अपडेट करण्यात आलंय. उल्लेखनीय म्हणजे, 'आयओेएस'चं हे सहावं अपडेट व्हर्जन आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.