म्युझिक आवडणाऱ्या लोकांसाठी खास स्मार्टफोन

 'मार्शल लंडन' हा जगातील सर्वात मोठ्या आवाजाचा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. मार्शल या कंपनीने हेडफोन्स आणि ब्लूटूथ स्पिकर्सनंतर आता स्मार्टफोनच्या दुनियेत आपले पाऊल टाकले आहे.

Updated: Jul 21, 2015, 04:36 PM IST
म्युझिक आवडणाऱ्या लोकांसाठी खास स्मार्टफोन title=

लंडन :  'मार्शल लंडन' हा जगातील सर्वात मोठ्या आवाजाचा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. मार्शल या कंपनीने हेडफोन्स आणि ब्लूटूथ स्पिकर्सनंतर आता स्मार्टफोनच्या दुनियेत आपले पाऊल टाकले आहे.

 हा अॅंड्राइड (लॉलीपॉप) चा फोन असून संगीत आवडणाऱ्या लोकांसाठी खास हा फोन बनवलेला आहे.  सर्वसाधारण मोबाईलसारखा दिसणारा हा फोन 4जी असून 8 मेगापिक्सल कॅमेरा, 2जीबी रॅम आणि 8जीबी स्टोरेज फॅसिलिटी आहे.

मार्शल लंडन या स्मार्टफोनमध्ये ग्लोबल इक्वलाइझर आहे जो कोणत्याही म्युझिक प्लेअरमध्ये कार्यरत होऊ शकतो. म्युझिकसाठी खास असे 'एम' नावाचे बटन देण्यात आले आहे ज्यामुळे थेट  म्युझिक प्लेअरमध्ये जाऊ शकता. 

याचसोबत डीजे प्लेइंग अॅपदेखील या फोनमध्ये देण्यात आले आहे. याबरोबर हेडफोन्सही देण्यात आले आहेत ज्यामुळे म्युझिक एकण्याची मजा द्विगुणीत होईल. संगीत आवडणाऱ्या लोकांसाठी 'मार्शल लंडन' हा फोन म्हणजे पर्वणीचं म्हणायला हवी. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.