ह्युंदाईची 'क्रेटा' कार लॉन्च

कोरियन कार कंपनी ह्युंदाईने मंगळवारी एसयूव्ही क्रेटा ही नवीन कार लॉन्च केली आहे. याची पहिल्या एक्स-शोरूम दिल्लीमधील किंमत रुपये ८ लाख ५९ हजार आहे 

Updated: Jul 21, 2015, 04:28 PM IST
ह्युंदाईची 'क्रेटा' कार लॉन्च  title=

नवी दिल्ली : कोरियन कार कंपनी ह्युंदाईने मंगळवारी एसयूव्ही क्रेटा ही नवीन कार लॉन्च केली आहे. याची पहिल्या एक्स-शोरूम दिल्लीमधील किंमत रुपये ८ लाख ५९ हजार आहे 

 टॉप मॉडेलची किंमत ११ लाख १९ हजार आहे तर डिझेल मॉडेलची किंमत सुमारे ९ लाख ४६ हजार आहे. ह्युंदाईने पहिल्यांदाचं त्यांच्या कारचे ग्लोबल लॉन्च भारतात केले आहे. 

कंपनीने एक दिवस आधीचं या कारचे फिचर्स घोषित केले होते. क्रेटा हे नाव क्रिएट या शब्दापासून आले आहे. ग्राहकांचे स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल चालवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही कार बाजारात आणण्याचा हेतू ह्युंदाईचा होता. 

 लाल, पांढरा, चंदेरी, काळा, राखाडी बरोबर सात रंगांचे पर्य़ाय या कारमध्ये आहेत. क्रेटाचे फिचर्स अतिशय विलक्षण असल्यामुळे इतर कंपन्यांना नक्कीचं टक्कर देईल.  या कारचे ६ मॉडेल्स असून १५ हजार प्रि-बुकींग भारतात झालेले आहेत असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.

पहिल्यांदाचं ऑटोमॅटीक ट्रान्समिशन  १.६  लीटर सीआरडीआय वीजीटी इंजिन वेरियंटमध्ये ऑटोमॅटीक ट्रान्समिशनची सुविधा करण्यात आली आहे. पहिल्यांदाचं अशी सुविधा देण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.