कपडे अंगावर न घेता झोपण्याचे फायदे

अंगावर कपडे न ठेवता झोपलं तर ते शरीरासाठी चांगलं असतं, त्याचे फायदे होतात असं म्हटलं जात आहे. याबाबतीत आरोग्याशी जाणकार व्यक्तींनी तसा दावा केला आहे. संपूर्ण कपडे काढून झोपल्याने शरीराचं तापमान नियंत्रित राहतं, यामुळे तुम्ही एक चांगली झोप घेऊ शकता.

Updated: Sep 27, 2015, 11:43 PM IST
 कपडे अंगावर न घेता झोपण्याचे फायदे title=

मुंबई : अंगावर कपडे न ठेवता झोपलं तर ते शरीरासाठी चांगलं असतं, त्याचे फायदे होतात असं म्हटलं जात आहे. याबाबतीत आरोग्याशी जाणकार व्यक्तींनी तसा दावा केला आहे. संपूर्ण कपडे काढून झोपल्याने शरीराचं तापमान नियंत्रित राहतं, यामुळे तुम्ही एक चांगली झोप घेऊ शकता.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार नॅशनल स्लीप फाउंडेशन पोलनुसार अमेरिकेत केवळ ८ टक्के व्यक्ती संपूर्ण कपडे काढून झोपणे पसंद करतात.

मेन्स हेल्थ आणि झोपेशी संबंधित अभ्यासक डब्ल्यू क्रिस्टोफर विंटर यांच्या मते, तुमच्या शरीराचं तापमान रात्रभर कमी जास्त होत असतं, तुम्ही मध्य झोपेत गेल्यानंतर तुमचं शरीर थंड पडत जातं, जेव्हा तुम्ही जाग येण्याच्या जवळ येत असतात, तुमचं शरीर गरम होत जातं.

विंटर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीराचं तापमान उतरल्याने रात्री घातलेले कपडे आपल्याला गरम वाटू लागतात, त्यामुळे रात्री शरीर बाजू बदलत असतं.

रिपोर्टनुसार, कपडे न घातल्याने झोपल्याचे अनेक फायदे आहेत, डॉयबेटीज नावाच्या मासिकात छापून आलेल्या एका रिपोर्टनुसार, कपडे न घातल्याने झोपल्याने वजन कमी करण्यास मदत होते.

मेन्स हेल्थ नुसार चांगल्या झोपेमुळे अन्न पचण्याची क्रिया वेगाने होते, आणि मानेत एकत्रित ब्राऊन फॅटचं प्रमाण वाढण्यास मदत होते, ब्राऊन फॅट आपल्या शरीराला गरम करण्यासाठी कॅलरीज बर्न करण्याचं काम करतो.

मेन्स हेल्थनुसार कपडे न घालता झोपल्याने शुक्राणूची संख्या वाढते, अतिशय घट्ट कपडे घालणे, शुक्राणूसाठी ठिक नाही, एवढंच नाही चांगली झोप, तणावाचे हार्मोन्स कॉर्टिसोलला नियंत्रित करण्यास मदत करतात.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.