फेसबुक प्रमुखाचा भारताला 'डिजिटल सलाम'

सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्गने डिजिटल इंडियाचं समर्थन करतांना, आपल्या फेसबुकपेजवर तिरंगा असलेला नवा फोटो लावला आहे.

Updated: Sep 27, 2015, 11:02 PM IST
फेसबुक प्रमुखाचा भारताला 'डिजिटल सलाम' title=

सिलिकॉन व्हॅली : सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्गने डिजिटल इंडियाचं समर्थन करतांना, आपल्या फेसबुकपेजवर तिरंगा असलेला नवा फोटो लावला आहे.

झकरबर्गने म्हटलं आहे की, डिजिटल इंडियाचं समर्थन करण्यासाठी आपण प्रोफाईल फोटो बदललेला आहे.

झकरबर्ग म्हणतो, ग्रामीण लोकसंख्येला इंटरनेटशी जोडण्यासाठी आणि जास्तच जास्त लोकांना ऑनलाईन सेवा देण्यासाठी हे समर्थन आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झकरबर्गला समर्थन देण्यासाठी धन्यवाद दिले, आणि झकरबर्ग प्रमाणे आपल्या प्रोफाईलचा फोटो बदलला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.