सलमान खान स्मार्ट फोनच्या दुनियेत, मोबाइल कंपन्यांची उडवणार झोप

दबंग अभिनेता सलमान खान स्मार्ट फोनच्या क्षेत्रात पदार्पण करण्याची दाट शक्यता आहे. आता तो स्मार्ट फोनच्या माध्यमातून व्यापाराच्या क्षेत्रात पाऊल टाकणार आहे. सलमानची खरी टक्कर ही चीनच्या मोबाईल कंपन्यांशी असणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 9, 2017, 07:20 PM IST
सलमान खान स्मार्ट फोनच्या दुनियेत, मोबाइल कंपन्यांची उडवणार झोप title=

मुंबई : दबंग अभिनेता सलमान खान स्मार्ट फोनच्या क्षेत्रात पदार्पण करण्याची दाट शक्यता आहे. आता तो स्मार्ट फोनच्या माध्यमातून व्यापाराच्या क्षेत्रात पाऊल टाकणार आहे. सलमानची खरी टक्कर ही चीनच्या मोबाईल कंपन्यांशी असणार आहे.

मोबाइल बाजारात उतरण्याची चाचपणी सलमान गेल्या दोन वर्षांपासून करत आहे. आपल्या स्मार्टफोनच्या उद्योगासाठी मोठ्या गुंतवणुकदारांसोबत सलमानची बोलणी सुरू झालेत. बीइंग ह्यूमन या ब्रॅंडचा मालक असलेल्या सलमानने स्मार्टफोनसाठी बीइंग स्मार्ट हे ट्रेडमार्क रजिस्टर केल्याचंही वृत्त आहे. 

बीइंग स्मार्ट (BeingSmart) असं त्या स्मार्टफोनचं नाव असू शकतं. ओपो, विवो, शाओमी, मायक्रोमॅक्स आणि इंटेक्स अशा कंपन्यांना टक्कर देण्यासाठी 20 हजारापर्यंत या फोनची किंमत असू शकते. सर्वप्रथम ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरून या फोनच्या विक्रीला सुरूवात होईल. त्यानंतर मोठ्या दुकानांमध्ये किंवा मॉलमध्ये हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असेल. बीइंग ह्यूमनच्या आउटलेटमध्येही फोनची विक्री होईल.

सलमान मोबाइल निर्मितीच्या क्षेत्रातून मिळणा-या उत्पन्नाचा उपयोग समाजकार्यासाठी करणार आहे.