गूगलला खरेदी करणाऱ्या युवकाला मोठं बक्षिस

एक मिनिटासाठी त्याने गूगल डॉट कॉम डोमेन खरेदी केलं होतं, मूळचा भारतीय असलेल्या सन्मय वेदला गूगलने या बदल्यात मोठं बक्षिस दिलं आहे. एका मिनिटासाठी वेद गूगलचा मालक झाला होता. एका वेबसाईटवर २९ सप्टेंबर रोजी गूगलचं डोमेन विक्रीला होतं, आणि सन्मय वेद या विद्यार्थ्याने ते खरेदी देखील केलं.

Updated: Oct 13, 2015, 11:03 AM IST
गूगलला खरेदी करणाऱ्या युवकाला मोठं बक्षिस title=

न्यूयॉर्क : एक मिनिटासाठी त्याने गूगल डॉट कॉम डोमेन खरेदी केलं होतं, मूळचा भारतीय असलेल्या सन्मय वेदला गूगलने या बदल्यात मोठं बक्षिस दिलं आहे. एका मिनिटासाठी वेद गूगलचा मालक झाला होता. एका वेबसाईटवर २९ सप्टेंबर रोजी गूगलचं डोमेन विक्रीला होतं, आणि सन्मय वेद या विद्यार्थ्याने ते खरेदी देखील केलं.

यानंतर गूगल याची माहिती मिळाल्यानंतर गूगलने हा सौदा रद्द केला. मात्र एका मिनिटासाठी सन्मय या डोमेनचा मालक झाला होता.

वेदने हे डोमेन १२ डॉलरला खरेदी केलं होतं. गुगलच्या सुरक्षेत असलेली ही चूक वेदने शोधून काढल्याबद्दल वेदला गूगलने मोठं बक्षिस दिलं आहे. अमेरिकेत वेद एमबीएचं शिक्षण घेत आहे.

गूगलकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, वेदने लिंक्डइनवर हा किस्सा शेअर केला आहे. गुगल वेबसाईट डोमेनमध्ये असलेल्या काही चुका वेदने शेअर केल्यानंतर त्याला मोठी रक्कम बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे, सन्मय वेद ही रक्कम भारतात शिक्षणासाठी काम करणाऱ्या एनजीओंना देणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.