'पोटभर’ खा, स्वस्थ राहा!

तुम्ही जर पक्के खवय्ये असाल तर तुमच्यासाठी एक नवं ऑप्शन मुंबईतल्या घाटकोपर परिसरात उपलब्ध झालंय. ‘पोटभर’ या आपल्या मराठमोळ्या नावासहीत हे एक छोटंसं जॉईंट आपली नवी ओळख निर्माण करू पाहतंय.

Updated: Mar 8, 2016, 11:48 PM IST
'पोटभर’ खा, स्वस्थ राहा! title=

शुभांगी पालवे, प्रतिनिधी, मुंबई : तुम्ही जर पक्के खवय्ये असाल तर तुमच्यासाठी एक नवं ऑप्शन मुंबईतल्या घाटकोपर परिसरात उपलब्ध झालंय. ‘पोटभर’ या आपल्या मराठमोळ्या नावासहीत हे एक छोटंसं जॉईंट आपली नवी ओळख निर्माण करू पाहतंय.

सुदीन मुके, स्वप्नील कांगणे आणि राकेश सावंत या तीन मराठी भिडुंनी एकत्र येत आपली पॅशन जपण्याचा प्रयत्न केलाय. हे तरुण उच्चशिक्षित असून कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये मोठ्या पदावर कार्यरतही आहेत. आपल्या नोकऱ्या सांभाळून ‘फूड बिझनेस’मध्ये हात आजमावण्याचा त्यांचा निर्णय मोठा धडाडीचाच म्हणावा लागेल. यात मोलाची मदत झाली ती राकेशची... राकेशची स्वत:ची जागा असल्यानं त्यांना एक भक्कम पाठबळ 'पोटभर'ला उपलब्ध झालंय.   

कुटुंबाची साथ मोलाची  

त्यांच्या या प्रयत्नांना त्यांच्या कुटुंबाकडून भरभक्कम साथ मिळालीय. नोकरी सांभाळून आपला बिझनेस सांभाळणं हे काही सोप्पं काम नव्हतं. पण, सुदीनच्या पत्नीनं म्हणजेच निलांबरी मुके हिंनं या जबाबदारीतला बराचसा भाग आपल्या खांद्यावर घेतलाय. आपली बँकेची नोकरी सोडून निलांबरी हिनं आपल्या या बिझनेसमध्ये महत्त्वाचा वाटा उचललाय.  

सुदीन आणि स्वप्नीलचं नुकतंच लग्न झालंय. आपल्या बिझनेसच्या व्यापामुळे आपल्या पार्टनरला – कुटुंबाला फारसा वेळही देता येत नाही. पण, तरीही दोघांनीही आपापल्या पार्टनरच्या संमतीनं आणि सोबतीनं आपला व्यवसाय पुढे नेण्याचा ध्यास घेतलाय.


डावीकडून निलांबरी, सुदीन, राकेश आणि स्वप्नील

आता या टीममध्ये आणखी एक भिडूही पूर्णवेळ सहभागी झालाय... स्वप्नीलचा भाऊ रोहन... काही वर्षे एका एमएनसीमध्ये ‘सप्लान चेन’ हॅन्डल करणारा रोहन ‘काहीतरी नवं शिकतोय’ म्हणत या टीममध्ये सहभागी झालाय. आपल्या नवनवीन आयडियाजसह या लांबच्या प्रवासातला साथीदार बनलाय. वयानं सर्वात लहान असला तरी सगळ्या गोष्टी शिकून घेण्यासाठी तो ‘ओपन’ आहे. आपला हा छोटासा बिझनेस कॉर्पोरेट वर्ल्डशी कसा कनेक्ट करता येईल, याच्या वेगवेगळ्या आयडियाज, त्यातल्या अडचणी आणि त्यावर उपाय कसा काढता येईल? यावर सध्या तो आपलं लक्ष केंद्रीत करतोय.

होम डिलिव्हरी आणि व्हॉटसअपवरही ऑर्डर

सँडविचेस, फ्रँकी, पिझ्झा आणि नवनवीन प्रकारचे ड्रिंक्स अशी व्हरायची तुम्हाला इथे मिळू शकेल. घाटकोपरमध्ये जागृती नगर मेट्रो स्टेशनच्या बाजुलाच असलेल्या शिवसेना ऑफिसच्या बाजुला हे छोटंसं पण वेगळं फास्ट फूड कॉर्नर आहे. होम डिलिव्हरीसाठी तुम्हाला केवळ ८२६८२४४७३८ या नंबरवर कॉल करावा लागेल... महत्त्त्वाचं म्हणजे, तुम्ही व्हॉटसअपवरही तुम्ही तुमची ऑर्डर देऊ शकता. 

आणखी एक गोष्ट म्हणजे, या पदार्थांची किंमत... क्वॉलिटी मेन्टेन केलेली असली तरी किंमती मात्र ग्राहकांच्या खिशाला परवडतील अशाच आहेत. या सगळ्या पदार्थांत वापरले जाणारे सॉसेस घरीच बनवले जातात... शरीराला घातक असे पदार्थ उदा. अजिनोमोटो किंवा कुठलेही फूड कलर्स न वापरता.... तसंच, हायजिन मेन्टेन केलं जातं.

टोस्टीज – सँडविचेस – पिझ्जा - ड्रिंक्स

सबवेमध्ये मिळणारी ४० रुपयांची ‘टोस्टीज’ इथे तुम्हाला केवळ २५ रुपयांना मिळू शकेल आणि मोठ्या साईजमध्ये... विथ ब्रॅन्डेड इनग्रेडियन्ट... 

पनीर टीक्का मसाला फ्रॅन्की, चायनिज हक्का नुडल्स फ्रॅन्की, पिझ्झा टोस्ट सॅन्डविच, गार्लिक टोस्टीज, कोल्ड कॉफी विथ चॉकलेट टॉपिंग्स असे पुष्कळ पदार्थ तुम्ही इथं चाखू शकता.

विकेन्ड स्पेशल फूड

डीजीएम पिझ्झा, कॉर्निको पिझ्झा, मेओनिज बेस कॉर्निको फ्रॅन्की हे काही खास लज्जतदार पदार्थ म्हणजे 'पोटभर'ची स्पेशालिटी... कोल्ड ड्रिंकला ऑप्शन हवंय तर मोजिटो ट्राय करा.

फ्युचर प्लान्स

रोजचं कॅन्टीनचं जेवण जेऊन तुम्ही बोअर झाला असाल तर 'पोटभर' तुमच्यासाठी लवकरच 'मुव्हिंग किचन' सुरू करणार आहे.