मुंबई : आज जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जातो. जगभरात महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम साजरे केले जातात. यामध्ये गुगल मागे कसे राहील.
दरवर्षीप्रमाणे सर्च जायंट असलेल्या गुगलने अनोख्या डूडलच्या माध्यमातून महिला दिनाच्या शुभेच्छआ दिल्यात. असं एकही क्षेत्र नाही जेथे महिला नाहीत. सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या केवळ खांद्याला खांदा लावूनच नव्हे तर त्यांच्यापुढे एक पाऊल पुढे टाकलेय.
गुगलच्या या डूडलमध्ये अंतराळवीर, वैज्ञानिक, खेळाडू, शिक्षक, संगीतकार आणि लेखिका या विविध क्षेत्रातील महिला दाखवण्यात आल्यात. हे दाखवताना गुगलने महिला शक्तीला सलाम केलाय.