मुंबई : ऑनलाईन चॅटिंग करताना आपण अनेक इमोजींचा वापर करतो, मात्र एका रिचर्सनुसार 'फेस विथ टियर्स ऑफ जॉय' इमोजी, हा आतापर्यंतची सर्वात लोकप्रिय इमोजी आहे.
रिसर्चनुसार युझर्सना मोठ्या प्रमाणात 'फेस विथ टियर्स ऑफ जॉय' ही इमोजी सर्वाधिक वापरली जाते. तसेच हार्ट इमोजीला पसंती देणाऱ्या रोमँटिक फ्रान्समध्येही हीच इमोजी लोकप्रिय आहे.
या सर्व्हेनुसार सुमारे २०० देशातील सुमारे ४० लाख स्मार्टफोन्सवरील ४० कोटी मेसेजद्वारे या इमोजीचा वापर करण्यात आला आहे. अमेरिकेच्या मिशिगन आणि चीनच्या पेकिंग विद्यापिठातील अभ्यासकांनी याबाबत हे सर्वेक्षण केलं.
देश-प्रांत वेगवेगळा असला तरी जगभरात भावना सारख्याच असतात त्यामुळे, 'फेस विथ टियर्स ऑफ जॉय' ही इमोजी जगभरात वापरली जाते. विविध भाषा, प्रांत, संस्कृतीमध्ये या इमोजीचा वापर होतो.
इमोजीवर केलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा रिसर्च असल्याचं सांगण्यात येत आहे. या रिसर्चसाठी संशोधकांनी किका इमोजी की-बोर्डचा वापर केला. हा की बोर्ड ६० भाषांमध्ये उपलब्ध आहे.