सॅमसंगच्या आगामी स्वस्त स्मार्टफोन 'Z1'चे फोटो लीक

स्मार्टफोन उत्पादन जगतातील नंबर-1 कंपनी सॅनसंगच्या एंन्ट्री लेव्हल स्मार्टफोन 'Z2'चे फोटो लीक झाले आहेत. हा फोन पुढील काही महिन्यांत बाजारात येणार होता. हा फोन 'टायझन' ऑपरेटिंग सिस्टम बेस्ड आहे.

Updated: May 7, 2015, 05:47 PM IST

नवी दिल्ली : स्मार्टफोन उत्पादन जगतातील नंबर-1 कंपनी सॅनसंगच्या एंन्ट्री लेव्हल स्मार्टफोन 'Z2'चे फोटो लीक झाले आहेत. हा फोन पुढील काही महिन्यांत बाजारात येणार होता. हा फोन 'टायझन' ऑपरेटिंग सिस्टम बेस्ड आहे.

ऑनलाइन लिक झालेल्या या फोटोंमध्ये हा फोन सॅमसंग गॅलेक्सी S3 आणि गॅलेक्सी S4 सारखा दिसत आहे. ज्या बाजारात स्मार्टफोनची विक्री मोठ्या प्रमाणावर आहे,

अशाच ठिकाणी हा फोन उतरवण्याची कंपनीची योजना आहे.

या फोनमध्ये 32 जीबी बिट क्वाडकोर सीपीयू आहे. 2,000mAh ची बॅटरी आहे. तसेच qHd TFT-LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या Z1 ला रिप्लेस करणार आहे.

या फोनच्या किंमतीविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मात्र या फोनची किंमत Z1च्या किंमती एवढी असण्याची शक्यता आहे. ऑनलाइन बाजारात Z1ची किंमत 5,500 रुपये आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.