पती-पत्नींमध्ये फेसबुक बनतंय घटस्फोटाचं कारण - रिपोर्ट

सोशल नेटवर्किंग साइट्सचा परिणाम आता खाजगी आयुष्यावर पण पडू लागलाय. त्यामुळं नात्यांमध्ये फूट पडू लागलीय. ब्रिटनमध्ये प्रत्येक सात जणांपैकी एका व्यक्तीच्या घटस्फोटाचं कारण सोशल नेटवर्किंग साइट ठरतंय. 

Updated: May 6, 2015, 05:47 PM IST
पती-पत्नींमध्ये फेसबुक बनतंय घटस्फोटाचं कारण - रिपोर्ट title=

मुंबई: सोशल नेटवर्किंग साइट्सचा परिणाम आता खाजगी आयुष्यावर पण पडू लागलाय. त्यामुळं नात्यांमध्ये फूट पडू लागलीय. ब्रिटनमध्ये प्रत्येक सात जणांपैकी एका व्यक्तीच्या घटस्फोटाचं कारण सोशल नेटवर्किंग साइट ठरतंय. 

इंग्लंडच्या एका कायदेशीर सल्लागार कंपनीनं नुकताच एक खुलासा केलाय. यात आपल्या जोडीदाराचा सोशल नेटवर्किंग साइटवर अधिक काळ घालवण्यावरून घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या झपाट्यानं वाढतेय.

फेसबुकनं नाते बदलले -
स्लेटर अँड गॉर्डनच्या कौटुंबिक कायद्याचे अध्यक्ष एंड्र न्यूबरीनं ऑनलाइन वक्तव्य जारी केलंय. त्यात ते म्हणाले, 'पाच वर्षांपूर्वी घटस्फोटांच्या प्रकरणांमध्ये फेसबुकचा संदर्भ होत नव्हता. पण आता लोकं सोशल मीडियावर असलेल्या कोणत्याही कंमेटच्या आधारे लग्न तोडण्याचे मुख्य कारण म्हणून सांगतात.'

न्यूबरी पुढे म्हणाले, 'आम्हाला अभ्यासात असं आढळलं की, सोशल मीडिया विवाह संबंधांसाठी नवं संकट बनलंय. अर्धेअधिक लोक आपल्या जोडीदाराच्या फेसबुकवरील वापरावर लपवून नजर ठेवतात आणि ते चेक करतात. प्रत्येक पाच मधील एक व्यक्ती फेसबुकशी निगडित कोणत्या बाबीवरून आपल्या जोडीदारासोबत भांडणाच्या स्थितीत आहेत.'

फेसबुकच्या वापरावरून आणि पासवर्डवरून लढाई

अहवालानुसार, आपल्या जोडीदाराचं फेसबुक अकाऊंट तपासण्यात मुख्य उद्देश असतो की, आपला जोडीदार कुणा-कुणासोबत संपर्कात आहे. आपल्या सोशल आयुष्याबद्दल ती व्यक्ती खरी बोलतेय. न्यूबरी यांच्यानुसार घटस्फोटाशी निगडित प्रत्येक प्रकरणात दररोज फेसबुक पोस्ट आणि फोटो कोर्टात सादर केले जावू लागलेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.