संगणकासमोर तासंतास बसूनही, डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्याचे उपाय

संगणकावर तासंतास काम करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे. तुमच्या डोळ्यांना संगणकाच्या स्क्रीनमधून येणाऱ्या किरणांचा त्रास होतो. पहिल्या टप्प्यात डोळ्यांना पाणी यायला सुरूवात होते, यानंतर डोळ्याचा नंबर वाढत जातो आणि जाड चष्मा लागतो.

Updated: Sep 30, 2015, 05:13 PM IST
संगणकासमोर तासंतास बसूनही, डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्याचे उपाय title=

मुंबई : संगणकावर तासंतास काम करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे. तुमच्या डोळ्यांना संगणकाच्या स्क्रीनमधून येणाऱ्या किरणांचा त्रास होतो. पहिल्या टप्प्यात डोळ्यांना पाणी यायला सुरूवात होते, यानंतर डोळ्याचा नंबर वाढत जातो आणि जाड चष्मा लागतो.

संगणकावर काम करणारे आयटी इंजीनिअर्स यांना हे अटळ असतं असं म्हटलं जातंय, पण यासाठी आपण काळजी घेतली, तर तुमचं डोळ्यांचं आरोग्य दीर्घकाळ चांगलं राहू शकतं.

तुमच्या संगणकाच्या स्क्रीनमधून येणारे किरण प्रखरपणे डोळ्यावर येतात, ते क्षीण करण्यासाठी एक सॉफ्टवेअर आलं आहे, तुमच्या पीसी, लॅपटॉप, किंवा मोबाईलवर F.LUX हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करा, त्यानंतर त्यात तुमचा पोस्टल पिन कोड अथवा, खाली दिसणारा गुगलमॅपवर तुमचं लोकेशन सेट करा.

असं केल्यावर तुमच्या आजूबाजूचं वातावरण जसंजस बदलत जाईल, त्याप्रमाणे तुमच्या संगणक स्क्रीनवरील किरणंही त्याप्रमाणे क्षीण होतील, त्यामुळे तुमच्या डोळ्यांना कोणताही त्रास होणार नाही.

F.LUX हे सॉफ्टवेअर मोबाईलवरही काम करत असतं, यामुळे मोबाईलप्रेमींनाही त्यांची डोळ्याची नजर चांगली राखता येणार आहे. एकदा हे F.LUX अपलोड केल्यानंतर डोळ्यांना काय फायदा झाला, याचा अनुभव आपण स्वत: घेऊ शकता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.