नऊ वर्षांची अनविताची कमाल, अॅपलने स्कॉलरशिप देऊन केला गौरव

वय वर्षे नऊ. नाव अनविता विजय. आज जगात अनविताच्या नावाची चर्चा आहे. तिने तशीच कमाल केलेय. तिचा अॅपलने सन फ्रान्सिस्कोमध्ये अॅपलच्या डेव्हलपर कॉंफरन्स wwdc 2016 मध्ये गौरवर केलाय. अनविता ही सर्वात कमी वयाची असून तिने असं अॅप तयार केलंय की त्याची दखल अॅपलने घेतली आणि तिचा सम्मान केला.

Reuters | Updated: Jun 14, 2016, 06:14 PM IST
नऊ वर्षांची अनविताची कमाल, अॅपलने स्कॉलरशिप देऊन केला गौरव title=

न्यूयॉर्क : वय वर्षे नऊ. नाव अनविता विजय. आज जगात अनविताच्या नावाची चर्चा आहे. तिने तशीच कमाल केलेय. तिचा अॅपलने सन फ्रान्सिस्कोमध्ये अॅपलच्या डेव्हलपर कॉंफरन्स wwdc 2016 मध्ये गौरवर केलाय. अनविता ही सर्वात कमी वयाची असून तिने असं अॅप तयार केलंय की त्याची दखल अॅपलने घेतली आणि तिचा सम्मान केला.

अनविता नाव का आलं चर्चेत

तिने आयफोन आणि आयपॅडमध्ये लहान मुलांना शिकण्यासाठी अॅप तयार केले. यात १०० जनावरांचे शब्द आणि आवाज ओळखने शक्य असेल.

कसं तयार केले अॅप

अनविता सात वर्षांची होती. तेव्हापासून तिला मोबाईल अॅप करण्याची इच्छा होती. त्यासाठी ती प्रशिक्षण घेण्यासाठी तयारी करत होती. मात्र, तिच्याकडे तेवढे पैसै नव्हते. त्यामुळे ती याचे शिक्षण घेऊ शकली नाही. मात्र, तिने हार मानली नाही. तिने ऑनलाईन अॅप कसे करायचे, याचा प्रोग्राम शिकला आणि तिने अॅप तयार केले. तेही आयफोनसाठी.

अॅपल स्कॉलरशिप 

अनविता अॅपल स्कॉलरशिप प्रोग्रामच्या माध्यमातून ती wwdc 2016मध्ये सहभागी झाली. अॅपलचा दरवर्षी डिवाईसचा अॅप बनविणाऱ्या जगातील डेव्हलपर यांचे संम्मेलन भरते. त्यासाठी त्यांना मोफत प्रवेश दिला जातो. या संम्मेलनासाठी ११९ लोकांची निवड करण्यात आली. यात १८ वर्षांपेक्षा कमी वयाचे होते.