Shatrughan Sinha Admitted To The Hospital : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानं नुकतंच बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न केलं. तिला सगळ्यांनी खूप शुभेच्छा दिल्या. या सगळ्यात झहीर इक्बालसोबत सोनाक्षी रुग्णालयातून निघताना दिसत आहे. त्यावरून सोनाक्षी प्रेग्नंट आहे अशी अफवा सुरु झाली. पण असं काही नसून बॉलिवूड अभिनेता आणि सोनाक्षी सिन्हाचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना भेटण्यासाठीच सोनाक्षी रुग्णालयात गेली होती.
रिपोर्ट्नुसार, शत्रुघ्न आता ठीक आहेत आणि ते फक्त रुटीन चेकअप करण्यासाठी गेले होते. सुरुवातीला अशा अफवा सुरु झाल्या होत्या की शत्रुघ्न सिन्हा हे सोनाक्षीवर झहीरसोबतच्या लग्नाच्या निर्णयामुळे नाराज आहेत. पण ती अफवा असल्याचं समोर आलं. शत्रुघ्न सिन्हा हे फक्त लग्नात उपस्थित राहिले नाही तर त्यांनी जोडप्याला शुभेच्छा देखील दिल्या. मात्र, लग्नाच्या कार्यक्रमांच्या तयारीत त्यांना थकवा जाणवू लागला त्यामुळे रेग्युलर चेकअप करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. अशात वडिलांची तब्येत कशी आहे हे जाणून घेण्यासाठी तिथे पोहोचली होती.
सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाविषयी बोलायचं झालं तर 23 जून 2024 रोजी तिनं झहीर इक्बालसोबत रजिस्टर्ड लग्न केलंय त्यानंतर, संध्याकाळी ग्रॅन्ड रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तिला शुभेच्छा देण्यासाठी अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यापैकी सलमान खान हा टाईट सिक्योरिटीमध्ये तिथे पोहोचला होता. त्याशिवाय हनी सिंग देखील दिसला. त्याच्या मैत्रिणीच्या लग्नात तो फार आनंदी असल्याचे दिसले. लग्नात सोनाक्षी सिन्हानं तिच्या आईची लग्नातली 40 वर्ष जूनी साडी नेसली होती. हीच साडी पूनम सिन्हा यांनी नेसली होती.
सोनाक्षीच्या लग्नाची सगळीकडे चर्चा सुरु झाली होती. तेव्हा पासून तिच्या लग्नासोबत शत्रुघ्न सिन्हा यांची देखील चर्चा सुरु होती. इतकंच नाही तर तिच्या लग्नानं तिच्या कुटुंबातील कोणीही आनंदी नाही, असं देखील म्हटलं जात होतं. इतकंच नाही तर तिचा भाऊ देखील यावेळी उपस्थित नव्हता असं म्हटलं जातं होतं.
हेही वाचा : दुसऱ्या दिवशी कमाईचा आकडा कमी; तरी प्रभासच्या 'कल्कि 2898 एडी' ची प्रेक्षकांना भुरळ
सोनाक्षी सिन्हाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ककूडा या चित्रपटात ती लवकर दिसणार आहे. हा चित्रपट 12 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. तर त्याच दिवशी कमल हासन यांचा 'इंडियन 2' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.