सध्या टी 20 चे विश्वचषकाकडे भारतीयांच्या नजरा वळल्या आहेत. गेल्या तीन सामन्यांमध्ये भारतीय संघाने टी 20 मालिकेतील केलेल्या कामगिरीने क्रिकेटप्रेमींचा उत्साह वाढला आहे.. म्हणूनच अंतिम सामन्यासाठी प्लेइंग 11 मध्ये काही बदल करण्यात येऊ शकतात असं सांगण्यात येत आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्माने अफगणिस्तान विरुद्धच्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये काही बदल केले होते. त्यामुळे आता अंतिम सामन्यात देखील कर्णधार रोहित संघामध्ये काही बदल करणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
दक्षिण अफ्रिका विरुद्धचा हा अंतिम सामना भारतासाठी अत्यंत अटीतटीचा असल्याने या संघातील सलामीवीर बदलण्याची दाट शक्यता आहे. जाणकारांच्या मते असं म्हणण्यात येत आहे की, शिवम दुबेची आता पर्यंतची खेळी पाहता, या अंतिम सामन्यात शिवम संघाबाहेर जाण्याची शक्यता आहे. याचं मुख्य कारण म्हणजे, आतापर्यंतच्या सामन्यात शिवमने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये केलेल्या कामगिरीने भारतीय संघात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
दुबे ऐवजी जयस्वालची होणार एन्ट्री ?
शिवम दुबेच्या निराशाजनक कामगिरीने अनेकांचा हिरमोड झाला. याच पार्श्वभूमीवर आता शिवम ऐवजी जयस्वालची अंतिम सामन्यासाठी निवड करण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे. जर जयस्वालची प्लेइंग 11मध्ये एन्ट्री झाली तर सलामीवीर खेळांडूंमध्ये देखील काही बदल होऊ शकतात. सामन्याचा सलामीवीर म्हणून खेळाची सुरुवात करणारा विराट तिसऱ्य़ा क्रमांकावर खेळू शकतो. त्यामुळे आता या अंतिम ,सामन्यात कर्णधार रोहित काय नवे बदल करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आजचा सामना हा दोन्ही देशांसाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे यंदाच्या विश्वचषक विजेतेपदाची ट्रॉफी भारताकडे यावी याकरिता रोहितच्या निर्णयाकडे अनेकांचं लक्ष वेधलं आहे.
टी20 विश्वचषक 2024 अंतिम सामन्यातील प्लेइंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत , सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रवींद्र जड़ेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह.