आसूसचा स्वस्त पण ढासू 'झेनफोन गो ४.५' बाजारात!

स्वस्त आणि मस्त अशा स्मार्टफोन मोबाईलच्या स्पर्धेत 'आसुस'च्या नव्या कोऱ्या 'झेनफोन गो ४.५' नं जोरदार एन्ट्री मारलीय. 

Updated: Dec 29, 2015, 02:08 PM IST
आसूसचा स्वस्त पण ढासू  'झेनफोन गो ४.५' बाजारात! title=

मुंबई : स्वस्त आणि मस्त अशा स्मार्टफोन मोबाईलच्या स्पर्धेत 'आसुस'च्या नव्या कोऱ्या 'झेनफोन गो ४.५' नं जोरदार एन्ट्री मारलीय. 

सोमवारपासून या स्मार्टफोनचा फ्लिपकार्टवर सेल सुरू झालाय. कंपनीनं याच वर्षी सप्टेंबरमध्ये 'झेनफोन गो' लॉन्च केला होता. या स्मार्टफोनचं लाईट व्हर्जन म्हणजे 'झेनफोन गो ४.५'...

'झेनफोन गो ४.५'चे फिचर्स

ऑपरेटिंग सिस्टम : अॅन्ड्रॉईड ५.१ 

- डिस्प्ले : ४ इंचाचा FWVGA (४८० X८५४ पिक्सल्स) 

- ड्युएल सिम स्मार्टफोन 

- प्रोसेसर : १.३ गिगाहर्टझचा मीडियाटेक MT6580M क्वॉड कोअर SoC प्रोसेसर

- रॅम : LPDDR ३

- इनबिल्ट स्टोअरेज : ८ जीबी

- स्टोअरेज : मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्यानं ६४ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकतं 

- कॅमेरा : ५ मेगापिक्सल

- रिअर कॅमेरा : ०.३ मेगापिक्सल

बॅटरी : १६०० mAH

इतर फिचर्स : थ्रीजी, वाय-फाय, इतर स्टँडर्ड कनेक्टिव्हिटी फिचर्स

याशिवाय, यूझर्सना दोन वर्षांसाठी १०० जीबीचं गूगल ड्राईव्ह स्टोअरेज मिळेल तसचं ५ जीबीचा आसुस वेब स्टोअरेज लाईफटाईम व्हॅलिडिटीवर फ्री मिळेल. या स्मार्टफोनची किंमत आहे केवळ ५,२९९ रुपये.