मुंबई : रिलायन्सने ४ जी सेवा सुरु करण्याची घोषणा केल्यानंतर मोबाईल कंपन्यात रेट दर कपात करण्याची स्पर्धाच सुरु झाली आहे. रिलान्य जीओ (आरजीओ) पुढच्या महिन्यात आपली ४जी सेवा सरु करण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा धसका अन्य कंपन्यानी घेतलाय.
टेलिकॉम कंपनीमध्ये डेटा स्पर्धा सुरु झाल्याने याचा फायदा ग्राहकांना होत आहे. आयडियाने दुसऱ्यांदा ३ जी आणि ४ जी दरात मोठी कपात केली आहे. त्यामुळे आयडियाने ६७ टक्के डेटा दर कमी केलेत.
आयडिया पाठोपाठ एअरटेलने प्री-पेड आणि पोस्ट पेडमधील दरात कपात केली आहे. कंपनीने ६७ टक्के डेटा दर कमी केलेत. तर व्होडाफोनही आपल्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतलाय. रिलायन्स जीओ १५ ऑगस्ट रोजी आपली सेवा सुरु करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याआधीच टेलिकॉम कंपनींनी आपला डेटा दर कमी केलाय.