शतकवीर नरेंद्र मोदी, सोशल मीडियावर धूम

 2014. सत्तेमध्ये परिवर्तन. अनेक वर्षांच्या काँग्रेस राजवटीला 'दे धक्का' दिला. प्रथमच सत्तेत भाजप अर्थात एनडीएचे सरकार केंद्रात विराजमान झाले. याचे श्रेय जाते ते नरेंद्र मोदी यांना. मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार आले. याच सरकारला 100 दिवस पूर्ण झालेत. मोदी फिव्हर सोशल मीडियातही पाहायला मिळत आहे.

Updated: Sep 2, 2014, 01:35 PM IST
शतकवीर नरेंद्र मोदी, सोशल मीडियावर धूम title=
सौजन्य, फेसबुक

नवी दिल्ली : 2014. सत्तेमध्ये परिवर्तन. अनेक वर्षांच्या काँग्रेस राजवटीला 'दे धक्का' दिला. प्रथमच सत्तेत भाजप अर्थात एनडीएचे सरकार केंद्रात विराजमान झाले. याचे श्रेय जाते ते नरेंद्र मोदी यांना. मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार आले. याच सरकारला 100 दिवस पूर्ण झालेत. मोदी फिव्हर सोशल मीडियातही पाहायला मिळत आहे.

देशातील जनतेला एक विकासाचे स्वप्न मोदी यांनी दाखविले. ते सत्यात उतविण्याचे शिवधनुष्य मोदी यांनी उचलले आहे. पंतप्रधान झालेल्या याच नरेंद्र मोदी यांना सोशल मीडियामधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवसागणिक मोदी यांची प्रसिद्धी वाढतच आहे. मोदींच्या 100 दिवसांच्या कालावधीत सोशल नेटवर्किंगसाईटमध्ये आघाडीवर असलेल्या फेसबुकच्या लाईकची संख्या अधिकच वाढलेली दिसत आहे.

मोदींच्या चाहत्यांची संख्या 6 मार्चला 1 कोटी 10 लाखांनी वाढली. त्यानंतर त्यांनी 1 कोटी 40 लाख करण्याचा संकल्प सोडण्यात आला. मोदींचे 2 कोटी फॉलोअर्स् आहेत. यामध्ये वाढ होतच आहे. फेसबुकचे महिन्याला 1.32 बिलियन फॉलोअर्स् अॅक्टीव्ह आहेत. त्यातील 108 फॉलोअर्स् भारतातील आहेत.

मोदींनी आपल्या पंतप्रधान कार्यालयाचे पेज फेसबुकवर उपलबंध केलेय. जेणेकरुन याच्या माध्यमातून देशाला जोडण्याचा त्यांनी संकल्प जोडला आहे. PMO India या नावाचेपेज तयार कऱण्यात आले आहे. फेसबुकवर 4,741,577 इतके लाईक पाहायला मिळतात. तसेच ट्विटर जनतेच्या सूचनाही मागविल्या आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यापुढे मोदी गेले आहेत. 4 कोटी 20 लाखांनी मोदींनी आघाडी घेतली आहे. मोदींच्या चाहत्यांमध्ये 18-34 वयोगटातील युजर्सची संख्या जास्त आहे. दिल्ली,उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमध्ये ही संख्या सर्वाधिक दिसून येत आहे.

मोदी सरकारमधील अनेक मंत्री फेसबुकच्या माध्यमातून जनतेला भेटत आहेत. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, सुषमा स्वराज, अरुण जेटली, स्मृती इराणी आदींसह अनेक मंत्री फेसबुकवर आहेत. एकूण 543 पैकी 332 खासदार हे फेसबुकवर आहेत. तर http://mygov.nic.in/ हे संकेतस्थळ मोदींनी सुरु केले आहे. यावर GOOD GOVERNANCE WITH YOUR PARTNERSHIP असे वाक्य लिहिले आहे. येथे तुम्ही Loginही करु शकता. 

सोशल मीडियावर :
एकूण खासदार 543 
संकेतस्थळ 129
फेसबुक 332  
ट्विटर 179 
युट्युब 102 
गूगल + 93

मोदी सरकारचे 100 दिवसांतील काही  निर्णय 
27 मे काळ्या पैशांची चौकशी करण्यासाठी तपास पथकाची स्थापना
28 मे गंगा शुद्धीकरणासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन आणि विशेष निधी
29 मे पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून नृपेंद्र मिश्रा यांच्या नेमणुकीसाठी सरकारतर्फे वटहूकुम
31 मे मंत्रिगट आणि विशेष अधिकारप्राप्त मंत्रिगट पद्द
8 जून पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी केंद्राची एकखिडकी योजना
10 जून सर्व केंद्रीय खात्यांनी आपली कार्यालये स्वच्छ, नीटनेटकी आणि प्रसन्न ठेवा, अशी सूचना
12 जून सरदार सरोवराची उंची 17 मीटरने वाढविण्यास हिरवा कंदील
15 जून पंतप्रधानांचा पहिला परदेश भूतान दौरा
21 जून रेल्वे  भाडेवाढ
4 जुलै पंतप्रधानांचा पहिला काश्मीर दौरा
5 जुलै इराकमध्ये अडकून पडलेल्या 44 परिचारिकांची सुटका करण्यात यश
8 जुलै मुंबई-अहमदाब पहिल्या बुलेट ट्रेनची घोषणा, रेल्वे अर्थसंकल्प सादर
10 जुलै रेल्वे, संरक्षण आणि विमा क्षेत्रात परकरीय गुंतवणुकीस चालना
13 जुलै सहाव्या ब्रिक्स परिषेदत भारताला ब्रिक्स बॅंकेचे अध्यक्षपद
15 जुलै राजपत्रित अधिकाऱ्यांऐवजी स्वयंसत्यांकनाचा पर्याय सुरु
24 जुलै संरक्षण आणि विमा क्षेत्रात 49 टक्के परकिय गुंतवणुकीस परवानगी
25 जुलै पंतप्रधानांचा नेपाळ दौरा
27 जुलै लोकांच्या नवीन कल्पना थेट पंतप्रधानांपर्यत पोहोचविण्यासाठी मायगव्ह या संकेतस्थळाची स्थापना
28 जुलै महत्वाच्या 12 बंदरांच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय मापदंडांची पूर्तता करण्यासाठी विस्तृत आराखडा सादर करण्याची सूचना
14 ऑगस्ट केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयातर्फे इनोव्हेशन बॅंकेची स्थापना करण्याची घोषणा
15 ऑगस्ट वियोजन आयोग बरखास्त आणि एनएसीचा अधिकार संकोच
19 ऑगस्ट भ्रष्टाचार रोखण्यासाठी आरटीओ यंत्रणा बरखास्त करणार
26 ऑगस्ट कालबाह्य कायदे किंवा तरतुदी शोधण्यासाठी व त्या काढून टाकण्यासाठी विशेष मंडळ
28 ऑगस्ट  पंतप्रधान जन-धन योजना शुभारंभ, पहिल्या दिवशी दीड कोटी बॅंक खाती.

30 ऑगस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 दिवसीय जपान दौऱ्यावर रवाना

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.