ए अक्षराने सुरु होणाऱ्या नावाची माणसे कशी असतात?

वैदिक ज्योतिषानुसार मुलाच्या नामकरणाचा शुभ मुहूर्त आणि ज्या नक्षत्रात व्यक्तीचा जन्म झाला त्यावरुन बाळाचे नाव ठेवले जाते. 

Updated: Mar 8, 2016, 02:37 PM IST
ए अक्षराने सुरु होणाऱ्या नावाची माणसे कशी असतात? title=

मुंबई : वैदिक ज्योतिषानुसार मुलाच्या नामकरणाचा शुभ मुहूर्त आणि ज्या नक्षत्रात व्यक्तीचा जन्म झाला त्यावरुन बाळाचे नाव ठेवले जाते. 

अंक ज्योतिषामध्येही व्यक्तिच्या पहिल्या नावाच्या अक्षराचे महत्त्व सांगितले आहे. अंक ज्योतिषानुसार व्यक्तीच्या नावातील पहिले अक्षर त्याच्या व्यक्तिमत्वाची ओळख करुन देते. 

ज्यांच्या नावाची सुरुवात इंग्रजीतील ए अथवा अ अक्षराने होते यांची दिशा पूर्व असते तर राशी सिंह असते तसेच अंक एक असतो. अशा व्यक्ती परिश्रम आणि सातत्याच्या जोरावर यशस्वी होतात. 

यांना यश हळू हळू मिळते. या व्यक्ती उर्जावान तसेच दृढ इच्छा शक्तीच्या असतात. एखादे लक्ष्य गाठायचे ठरवल्यास मग ते मागे वळून पाहत नाहीत. ज्यांच्या नावाची सुरुवात एपासून होते त्या व्यक्ती परिस्थितीनुसार स्वत:ला बदलतात आणि त्यानुसार निर्णय घेतात. 

यांचा स्वभाव जिद्दी असतो. मात्र संबंधित व्यक्तींची त्या चांगली काळजीही घेतात. या व्यक्तींचे दाम्पत्य जीवन सुखद असते. अनेकदा मनापेक्षा मेंदूने अधिक काम करतात.