मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची आणि सुरक्षेची बातमी लोहमार्ग पोलिसांनी दिली. हायटेक जमान्यात रेल्वे पोलीसही हायटेक झालेत. यासाठी सोशल नेटवर्कींक साईटसचा वापर रेल्वे पोलिसांनी सुरु केला. त्याची सुरुवात रेल्वे पोलिसांनी फेसबुक पेजवरुन केली. रेल्वे पोलिसांनी स्वत:चं एक फेसबुक पेज तयार केले आहे. ज्यावर आपण कधीही कोणत्याही ठिकाणावरुन आपली तक्रार नोंदवू शकता.
फेसबुकच्या माध्यमातून लोकांना तक्रारी करणं सोप जावे म्हणून लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल आणि डीसीपी दीपक देवराज यांनी काम हाती घेतलं. त्यात त्यांना यश आले. रेल्वेने प्रवास करताना काहीही घटना घडली की, त्यासाठी थेट जबाबदार धरलं जातं ते रेल्वे पोलिसांना. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे पोलीसांन विरोधात तक्रार करायाला वाव मिळू नये या करता लोहमार्ग पोलिसांनी फेसबुकचा आधार घेतलाय.
त्यासाठी www.facebook.com/mumbairailwaypolice हे फेसबूक पेज लोहमार्ग पोलिसांनी तयार केले. ज्यावर आपण तक्रार करु शकता ज्याची दखल घेऊन पोलीस थेट एफआय़आर दाखल करतील. त्यामुळे आपण फेसबूक युजर असाल आणि रेल्वे प्रवासी असाल तर, आपली तक्रार फेसबूक पेजवर देखील करु शकता.
महिलांच्या सुरक्षेसाठी ‘निर्भया पथका’ची क्षमता वाढवणे, फेसबुकवरून थेट संवाद साधणे, सीसीटीव्हीचा पाठपुरावा आदी योजनांतर्गत रेल्वे पोलीस दलाचा कायापालट करण्याचा प्रयत्न रेल्वे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी केला आहे. एवढचं नाही तर, निर्भया पथकाबरोबरच आता प्रत्येक स्थानकावर एक प्रवासी सुरक्षा समिती स्थापन करण्याचा निर्णय रेल्वे पोलिसांनी घेतला आहे. प्रवाशांशी संपर्क वाढवण्याची मोहीम रेल्वे पोलिसांनी हाती घेतली आहे.
पश्चिम आणि मध्य रेल्वेमार्गावर तब्बल ८० लाख मुंबईकर दर दिवशी प्रवास करतात. या सर्व प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांवर असते. त्यासाठी सिंघल यांनी समित्या स्थापन करुन त्यात विद्यार्थी, महिला प्रवासी, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, शिक्षक, पत्रकार आणि पोलीस यांचा समावेश करणार असल्याचं सांगितलं.
या समितीची बैठक दर महिन्यातून एकदा घेतली जाईल. या बैठकीत सुरक्षाविषयक विविध बाबींचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे www.facebook.com/mumbairailwaypolice याचा वापर करुन तुम्ही लोहमार्ग पोलिसांना सहकार्य करा, असे आवाहन करण्यात आले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.