रिलायन्स जिओबाबत होऊ शकते मोठी घोषणा

रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आज Reliance Jio बाबत मोठी घोषणा करु शकतात. १० कोटी ग्राहकांचा रेकॉर्ड केल्यानंतर मोठी घोषणा होऊ शकते. सध्या कंपनीने ३१ मार्चपर्यंत फ्री डेटा-कॉलिंग सर्विस दिली आहे. मुकेश अंबानींनी १ सप्टेंबरला रिलायंस जिओची 4G सर्विस लॉन्च केली होती.

Updated: Feb 21, 2017, 02:00 PM IST
रिलायन्स जिओबाबत होऊ शकते मोठी घोषणा title=

मुंबई : रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आज Reliance Jio बाबत मोठी घोषणा करु शकतात. १० कोटी ग्राहकांचा रेकॉर्ड केल्यानंतर मोठी घोषणा होऊ शकते. सध्या कंपनीने ३१ मार्चपर्यंत फ्री डेटा-कॉलिंग सर्विस दिली आहे. मुकेश अंबानींनी १ सप्टेंबरला रिलायंस जिओची 4G सर्विस लॉन्च केली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार मुकेश अंबानी आज होणाऱ्या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये रिलायंस जिओबाबत काही घोषणा करु शकतात. १६ फेब्रुवारीला मुकेश अंबानीनी आनंदात म्हटलं होतं की, आधारमुळे आम्ही एका दिवसात १० लाख लोकांना जोडण्यात यशस्वी झालो. असं याआधी कधीच नाही झालं.

सूत्रांच्या माहितीनुसार मुकेश अंबानी जिओमध्ये गुंतवणूक करणे सुरु ठेवणार आहेत. आतापर्यंत त्यांनी 1.7 लाख कोटींची गुंतवणूक केली आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कंपनीच्या बोर्डने 30 हजार कोटीचा फंड जारी केला. जो नेटवर्क वाढवण्यासाठी आणि कव्हरेज मजबूत करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.