रिलायन्स जिओबाबतीत मुकेश अंबानीची मोठी घोषणा

रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आज Reliance Jio बाबत मोठी घोषणा केली. १० कोटी ग्राहकांचा रेकॉर्ड केल्यानंतर मोठी घोषणा होऊ शकते असं म्हटलं जात होतं त्यानुसार त्यांनी ग्राहकांसाठी आणखी काही ऑफर्स आणल्या आहेत.

Updated: Feb 21, 2017, 02:49 PM IST
रिलायन्स जिओबाबतीत मुकेश अंबानीची मोठी घोषणा title=

मुंबई : रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आज Reliance Jio बाबत मोठी घोषणा केली. १० कोटी ग्राहकांचा रेकॉर्ड केल्यानंतर मोठी घोषणा होऊ शकते असं म्हटलं जात होतं त्यानुसार त्यांनी ग्राहकांसाठी आणखी काही ऑफर्स आणल्या आहेत.

जिओच्या ग्राहकांनी एक मोठा रेकॉर्ड केला आहे. मागील महिन्यात त्यांनी 100 कोटी जीबी डेटाचा वापर केला आहे. प्रत्येक सेंकदाला जिओसोबत ७ ग्राहक जोडले गेले. २०१७ पर्यतच्या वर्ष संपेपर्यंत जिओ प्रत्येक शहरात पोहोचेल असं मुकेश अंबानींनी म्हटलं आहे. ९९ टक्के जनतेपर्यंत जिओ पोहोचेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

४जी बेस स्टेशनची संख्या डबल करण्यात आली आहे. 170 दिवसात जिओने 100 मिलियन यूजर्सचा आकडा गाठला आहे. जिओ त्यांच्या प्राइम मेंबर्सला अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेट फ्री देणार आहे.

३१ मार्चनंतर ऑफर संपली की रिलायंस जिओ त्यांच्या ग्राहकांसाठी नवे-नवे प्लान आणणार आहे. 4जी ग्राहकांना कॉलिंगसाठी कोणतीही रक्कम नाही भरावी लागणार. इंटरनेट वापरासाठी फक्त 100 रुपये शुल्क लागणार आहे. जो 30 जूनपर्यंत वैध राहिल.

रिलायंस जिओसाठी ३१ मार्च २०१७ नंतरचा वेळ महत्त्वाचा असणार आहे. फ्री सर्विस संपल्यानंतर अनेक जण सिम वापरणे सो़डून देतील म्हणून रिलायन्स त्यानंतर काही आणखी सर्विस आणून ग्राहकांना आपल्यापासून लांब जाऊ देणार नाही.

प्राइम मेंबरशिपनुसार ३१ मार्च आधी जिओशी जुडणाऱ्या ग्राहकांना ९९ रुपयात पुन्हा न्यू इयर ऑफर १२ महिन्यांसाठी मिळणार आहे. ज्यामध्ये वॉइस, व्हिडिओ कॉलिंग, 4जी इंटरनेटसह जिओ अॅपचं सबस्क्रिप्शन फ्री असणार आहे. या ऑफरसाठी ३१ मार्चपर्यंत अजून ग्राहक जिओसोबत जोडले जाऊ शकतात. १ एप्रिलपासून टेरिफ प्लान सुरु होणार आहे. पण जिओ इतर कंपन्यांच्या तुलनेत प्रत्येक प्लानमध्ये २० टक्के अधिक डेटा देणार आहे.