नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टचा ऑपरेटिंग सिस्टीम WINDOWS 7 चा असणारा सपोर्ट बंद होणार आहे. WINDOWS 7 साठी कोणत्याही प्रकारचे सॉफ्टवेअर अपडेटस, सिक्युरिटी पॅचेस १३ जानेवारी २०१५ पासून मिळण्यास बंद होणार आहे.
यानंतर ऑपरेटिंग सिस्टम हँकिंग किंवा वायरस अटॅक सुरक्षित राहणार नाही. मायक्रोसॉफ्टने एप्रिलमध्ये लोकप्रिय ओएस विन्डोज एक्सपीसाठी ही सपोर्ट करण्यास बंद केलेय.
मेनस्ट्रीम सपोर्ट बंद, एक्सटेंडेड सपोर्ट सुरु
WINDOWS xp ज्यावेळेस सपोर्ट करण्यास बंद झाले तेव्हा खूप समस्या आल्या होत्या तशाच यावेळी देखील WINDOWS 7 सपोर्ट बंद केल्यानंतरही येणार आहेत.
जे कोणी प्रायव्हेट आणि सरकारी सिस्टम WINDOWS 7 वर काम करतात त्याच्यासाठी हॅक होण्याचा खूप धोका आहे. सध्यातरी फक्त मेनस्ट्रीम सपोर्ट बंद करणार आहेत आणि एक्सटेंडेड सपोर्ट २०२० पर्यंत असणार आहे. मात्र एक्सटेंडेंड सपोर्टसाठी लोकांना पैसै द्यावे लागणार आहेत.
मेनस्ट्रीम सपोर्ट म्हणजे काय?
मेनस्ट्रीम सपोर्ट बंद होणार म्हणजे, अशा काही फ्री सर्व्हिसेस बंद होणे. मेनस्ट्रीम सपोर्ट बंद झाल्यानंतर सिक्युरिटी अपडेटसना सोडून बाकी सर्व अपडेटससाठी यूजर्संना कंपनीला पैसा द्यावे लागतात.
मेनस्ट्रीम वि. एक्सटेंडेड
WINDOWS xp चा मेनस्ट्रीम सपोर्ट १४ एप्रिल, २००९ला बंद झाला तर एक्सटेंडेंड सपोर्ट ८ एप्रिल २०१४ ला बंद झाला होता. कंपनी जेव्हा मेनस्ट्रीम सपोर्ट बंद करते तेव्हा सरकारी संस्थान ऑपरेटिंग सिस्टमशी जोडले गेलेले अपडेटस मिळविण्यासाठी तर काही वेळापर्यंत सुरु ठेवण्यासाठी कंपनीला पैसै देते, असं केल्याने कंपनीला आपल्या कॉम्प्युटर सिस्टम आणि सॉफ्टवेअर अपडेटसाठी काही वेळ मिळतो. याच कारणाने WINDOWS 7 मेनस्ट्रीम बंद झाली की ५ वर्षापर्यंत त्याचा एक्सटेंडेड सपोर्ट सुरु असेल.
मेनस्ट्रीम सपोर्ट बंद झाल्यानंतर १४ जानेवारी २०२० पर्यंत WINDOWS 7 चे एक्सटेंडेड सपोर्ट राहिल. WINDOWS 7 च्या नंतर ऑक्टोबर २०१४ पर्यंत ऑफिस २०१० सर्व्हिस पॅक चा कालावधीही संपेल. यासोबत मायक्रोसॉफ्टचे बाकी काही प्रोडक्टस जसं की, व्हिजुअल स्टुडिओ २०१२ रिमोट टूल्स, एक्सप्रेस फॉर वेब, WINDOWS सर्व्हर २००३ चाही सपोर्ट बंद होईल. विन्डोज फोन ऑपरेटिंग सिस्टम ७.८ चा मेनस्ट्रीम सपोर्टही १४ सप्टेंबर २०१४ ला बंद होईल.
सूत्रांच्या माहितीनुसार, मायक्रोसॉफ्ट आपल्या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम WINDOWS 8 आणि 8.1 चे मेनस्ट्रीम सपोर्ट बंद करण्याची तारीख ही निश्चित केली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ९ जानेवारी २०१८ पर्यंत 8चा मेनस्ट्रीम सपोर्ट बंद होईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.