फेसबूकच्या मालकाची 'प्यारवाली लव्ह स्टोरी'

फेसबूकचा संस्थापक आणि मालक मार्क झकरबर्गची लव्ह स्टोरी तशी रंजक आहे. मार्क झकरबर्ग आणि त्याची पत्नी प्रेसिला चॅन यांची ओळख  बाथरूमसाठी लागलेल्या रांगेत झाली. एका पार्टीला मार्क झकरबर्ग आणि प्रेसिला चॅन उपस्थित होते, त्यावेळी त्यांची पहिल्यांदा ओळख झाली. ही पार्टी मार्क झकरबर्गच्या भावाने आयोजित केली होती.

Updated: Feb 8, 2016, 10:14 PM IST
फेसबूकच्या मालकाची 'प्यारवाली लव्ह स्टोरी' title=

मुंबई : फेसबूकचा संस्थापक आणि मालक मार्क झकरबर्गची लव्ह स्टोरी तशी रंजक आहे. मार्क झकरबर्ग आणि त्याची पत्नी प्रेसिला चॅन यांची ओळख  बाथरूमसाठी लागलेल्या रांगेत झाली. एका पार्टीला मार्क झकरबर्ग आणि प्रेसिला चॅन उपस्थित होते, त्यावेळी त्यांची पहिल्यांदा ओळख झाली. ही पार्टी मार्क झकरबर्गच्या भावाने आयोजित केली होती.

प्यारवाली लव्ह स्टोरी
तेव्हा प्रेसिला बोस्टन विद्यापिठाच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थीनी होती, यानंतर हॉवर्ड विद्यापिठात आल्यानंतर भेटीगाठी सुरू झाल्या. या दरम्यान प्रेसिलाला मार्कचा स्वभाव चांगलाच कळला होता. यानंतर मार्क झकरबर्गने आपल्या जीवनातील महत्वपूर्ण निर्णय घेतला.

शिक्षण सोडलं
यानंतर झकरबर्गने आपली कंपनी चालवण्यासाठी शिक्षण सोडलं, फेसबुकसाठीच झकरबर्गने नोकरी सोडली होती. मार्कने हॉवर्ड युनिवर्सिटी सोडल्यानंतरही ती झकरबर्ग सोबत होती, झकरबर्ग आपल्या कामाला अधिक महत्व देत होता, भरपूर मेहनत घेत होता.

या दरम्यान प्रेसिलाला एवढा वेळ देता येत नव्हती, मात्र तरीही ते कधी दूर गेले नाहीत. प्रेसिला मार्क झकरबर्गसोबत अशा वेळेसही होती. जेव्हा मार्क झकरबर्ग शून्य होता. मात्र फेसबूकचं जग निर्माण करण्याचं स्वप्न पाहत होता. 

फेसबूकचा मालक करोडपती झाला...
फेसबूकने काही वर्षानंतर जोरदार कमाई करण्यास सुरूवात केली.  काही वर्षात मार्क करोडपती झाला. मात्र नाव आणि पैसा या दोन्ही जणांच्या आत कधीच नाही आला. 

पहिली महिला फेसबूकवर आली...
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फेसबूकची प्रेसिला २००५ मध्ये पहिली महिला युझर्स झाली. त्यांचं प्रेम एवढं मजबूत होतं की, मार्क कॅलिफोर्निया आल्यानंतर प्रेसिलाही कॅलिफोर्नियाला आली, ती कॅलिफोर्निया विद्यापिठात वैद्यकीय शिक्षण घेत होती.

फेसबूक पोस्टचा सहारा
मार्क आणि प्रेसिलाच्या फेसबूक पोस्ट जर तुम्ही पाहिल्या तर ते दुरावा कमी करण्यासाठी फेसबूक पोस्टचीही मदत घेत होते, त्याशिवाय अनेक महत्वाच्या गोष्टीही त्यांनी फेसबूकवर शेअर केल्या. मग ती प्रेसिलाची ग्रॅज्युएट होण्याची माहिती असो किंवा एखाद्या टूरची. घरात येणाऱ्या नव्या पाहुण्याची, पार्टीत सामील होण्याच्या पोस्टही त्यांनी फेसबूकवर टाकल्या.

शंभर मिनिटं एकमेकांना देण्याची सक्ती
प्रेसिला आणि मार्क हे अधिक जवळ आले तेव्हा प्रेसिलाने अनेक गोष्टी आपल्या हातात घेतल्या, यात तीने मार्कसाठी काही कडक कायदे केले, कमीत कमी १०० मिनिटं एकमेकांना देण्याचा निर्णय त्यांनी घेतला, त्यात फेसबूकवरील विषयाचा समावेश नसेल, तसेच आठवड्यातून एकदा डेटिंग करण्याचीही सक्ती होती.

फेसबूकच्या मालकाचं लग्न
मार्क आणि प्रेसिलाने २०१२ मध्ये लग्न केलं, त्यांचं प्रेम सुरूच होतं, त्यानंतर नोव्हेंबर २०१२ मध्ये मार्कने एक पोस्ट केली, त्यात त्याने म्हटलं होतं, आजपासून अकरा वर्षापूर्वी मी एका अदभूत मुलीला भेटलो, प्रेसिला धन्यवाद मला जमिनीशी जोडून ठेवलं त्याबद्दल. नोव्हेंबर २०१५ मध्ये मार्क-प्रेसिला एक कन्या झाली. त्यांनी आपल्या मुलीच्या नावे एक आव्हान स्वीकारलं, फेसबूकचा ९० टक्के पैसा 'चॅन झुकरबर्ग इनिशेटिव्ह' नावाच्या संस्थेला दान केला.