मुंबई : आजच्या धकाधकीच्या जगात अनेकांना लग्नगाठी जुळवण्यासाठी वेळ नाही, मात्र व्हॉटसअॅप ग्रुपच्या माध्यमातून ते शक्य होत आहे.
तेव्हा जितेंद्र रौंदळे, हिरालाल पाटील, निळकंठ पाटील या सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येऊन व्हॉटस अॅपवर 'मराठा वधूवर सूचक ग्रुप' बनवला (खानदेशसाठी) आहे. या व्हॉटस अॅपग्रुपवर फक्त बायोडेटा आणि वधू-वराचे फोटो मेंबर्स अपलोड करतात, यातून अनेकांची लग्न गाठ बांधली जात आहे.
या ग्रुपमध्ये आपला किंवा नातेवाईकांचा समावेश करण्यासाठी या क्रमांकावर आपला नंबर पाठवा, हिरालाल पाटील - 981 981 59 10, जितेंद्र रौंदळे 932 203 96 97, निळकंठ पाटील 8888 44 49 95
वरील क्रमांकावर आपला नंबर व्हॉटस अॅपने पाठवूनच तुम्हाला या ग्रुपमध्ये सामिल होता येणार आहे. तुमचा नंबर पाठवल्यानंतर तुम्हाला ग्रुपमध्ये सामिल करून घेण्यात येते, यानंतर तुम्ही तुमचा बायोटाडा आणि फोटो त्या ग्रुपमध्ये टाका.
या व्हॉटसअॅप ग्रुपवर आतापर्यंत १ हजारपेक्षा जास्त बायोडेटा आणि फोटो आलेले आहेत. यासाठी कोणताही शुल्क नाही, किंवा विवाह मेळाव्यास जाण्याची गरज नाही.
जितेंद्र रौंदळे यांनी असे तीन व्हॉटसअॅप ग्रुप बनवले आहेत. सदस्य संख्येची मर्यादा संपल्यानंतर त्यांना आणखी चौथा व्हॉटसअॅप ग्रुप सुरू करावा लागला आहे. या ग्रुपमध्ये समावेश करून घेण्यासाठी काही कडक नियम आहेत. या ग्रुपमध्ये फक्त वधू किंवा वर यांचेच फोटो आणि बायोडेटा अपलोड करण्याचा अधिकार आहे.
इतर कोणताही मेसेज टाकल्यास व्हॉटसअॅप ग्रुप मेंबरला ग्रुप सोडण्याची विनंती केली जाते. सर्व ग्रुपमधील फोटो हे चारही ग्रुपवर जातात. त्यामुळे अनेकांना घरबसल्या किंवा कामावर असताना इच्छूक व्यक्तींना माहिती मिळते.
लग्न जमवण्यासाठी असे व्हॉटसअॅप ग्रुप प्रत्येक समाजाने तयार करावेत यामुळेमुळे वेळ आणि पैसा वाचत असल्याचं रौंदळे यांनी म्हटलं आहे. रौंदळे यांचा व्हॉटसअॅप ग्रुप हा धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबारमधील मराठा बांधव तसेच या प्रांतातून कामानिमित्त बाहेर गेलेल्या मराठा समाजातील बांधवांसाठी आहे.
ग्रुपवरील माहिती पाहून व्हॉटसअॅप ग्रुप मेंबर स्वत: वधू किंवा वर यांच्या नातेवाईकांशी बोलतात. यातून अनेकांचं शुभमंगल झाल्याचं समोर येत आहे.