'सेल्फी'ची क्रेझ असणाऱ्यांसाठी हा नवीन फोन...

'आयफोन ६'सारखा दिसणारा आणखी एक फोन बाजारात दाखल झालाय. 'लेनोवो सिसली S९०' हा फोन नुकताच भारतात लॉन्च करण्यात आलाय. 

Updated: Feb 5, 2015, 03:00 PM IST
'सेल्फी'ची क्रेझ असणाऱ्यांसाठी हा नवीन फोन... title=

मुंबई : 'आयफोन ६'सारखा दिसणारा आणखी एक फोन बाजारात दाखल झालाय. 'लेनोवो सिसली S९०' हा फोन नुकताच भारतात लॉन्च करण्यात आलाय. 

'सेल्फी'ची क्रेझ असणाऱ्या युझर्ससाठी हा फोन म्हणजे पर्वणीच ठरणार आहे... कारण, या फोनमध्ये फ्रंट कॅमेराच ८ मेगापिक्सलचा देण्यात आलाय. 
 
या फोनची आणखी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, इतर मोबाईल कंपन्यांचा सध्याचा ट्रेंड या फोननं बाजुला सरकवलाय. हा मोबाईल अजूनही तुम्हाला लेनोवो इंडियाच्या वेबसाईटवर किंवा ई-कॉमर्सच्या वेबसाईटवर तुम्हाला सापडणार नाही. पण, रिटेलर्सजवळ मात्र या स्मार्टफोन्सचा स्टॉक येणं सुरु झालंय. 

'लेनोवो सिसली S९०'चे काही फिचर्स...

स्क्रीन : ५ इंचाचा सुपर अमोल्ड स्क्रीन, मल्टिटच सपोर्ट स्क्रीन 

* डिस्प्ले : एच डी क्वॉलिटी डिस्प्ले (७२०*१२८० पिक्सल रिझोल्युशन)  

* प्रोसेसर : १.२ गीगाहर्टझ (कॉर्टेक्स A५३ क्वाड-कोर प्रोसेसर)

रॅम : १ जीबी किंवा २ जीबी 

इंटरनल मेमरी : १६ जीबी आणि ३२ जीबी

रिअर कॅमेरा : १३ मेगापिक्सल (ऑटोफोकस, एलईडी फ्लॅशसहीत) 

फ्रंट कॅमेरा - ८ मेगापिक्सल 

* ड्युएल सिम फोन  (ड्युएल स्टँडबाय फिचरसहीत) 

ऑपरेटिंग सिस्टम : अँन्ड्रॉईड ४.४.४ किटकॅट

* वजन : १२९ ग्रॅम 

सिम : माइक्रो सिम

बॅटरी : २३०० मेगाहर्टझ पॉवरची बॅटरी

हा फोन नोव्हेंबर महिन्यात चीनी बाजारात लॉन्च करण्यात आला होता. याची किंमत जवळपास २०,००० रुपये होती. भारतीय बाजारात हा फोन जवळपास त्याच किंमतीत  १९,९९० रुपयांत उपलब्ध आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.