अबब! गुगलच्या ऑफिसमध्ये काम करतात 200 बकऱ्या!

सामान्यपणे कोणत्याही कंपनीत काम करण्यासाठी महिला आणि पुरुषांची भर्ती केली जाते हे आपण ऐकलं असेल. मात्र कधी कोणत्या कंपनी बकऱ्या काम करतात, हे ऐकलंय का? 

Updated: Feb 5, 2015, 09:51 AM IST
अबब! गुगलच्या ऑफिसमध्ये काम करतात 200 बकऱ्या! title=

नवी दिल्ली: सामान्यपणे कोणत्याही कंपनीत काम करण्यासाठी महिला आणि पुरुषांची भर्ती केली जाते हे आपण ऐकलं असेल. मात्र कधी कोणत्या कंपनी बकऱ्या काम करतात, हे ऐकलंय का? 

आपल्याला ऐकायला जरा हे विचित्र वाटेल पण जगातील नामवंत कंपनी गुगलमध्ये एक-दोन नाही तर तब्बल 200 बकऱ्या नोकरी करतात. 

गुगलच्या ऑफिसमध्ये या 200 बकऱ्या फक्त नोकरी करत नाही तर त्यांना त्याचा पगारही मिळतो. यासोबतच त्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था सुद्धा केली जाते. 

गुगलच्या ऑफिसमध्ये या बकऱ्या कोणत्या सॉफ्टवेअरवर काम नाही करत तर ऑफिसच्या लॉनमधील गवत खातात. ज्यामुळं गवताचं ट्रिमिंग होतं सोबतच बकऱ्यांचं पोटही भरतं.

गुगलनं स्वत: आपल्या ब्लॉगमध्ये बकऱ्यांना नोकरी दिल्याची माहिती दिलीय. आठवड्यातून एकदा या 200 बकऱ्या गुगलच्या मोठ्या लॉनमध्ये सोडून देतात आणि काही तासांमध्येच त्या वाढलेलं गवत खाऊन घेतात. तसंच बकऱ्यांनी फक्त गवतच खावं यासाठी त्यांच्यावर लक्ष देणाऱ्या गुराख्यांना त्यासाठी खास ट्रेनिंग दिलं गेलंय.

गुगल आपल्या ऑफिसच्या लॉनमध्ये गवत कापण्यासाठी मशिनचा वापर करत नाहीत. त्यातून निघणारा धूर आणि आवाज ऑफिसमध्ये इन्होवेशनसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्रास देतो. म्हणून गुगल मॅनेजमेंटनं लॉनचं गवत साफ करण्यासाठी बकऱ्यांना नोकरी दिलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.