मुंबई : बाजारात बरंच फुटेज खाल्यानंतर 'लेनोवो'चा ए-७००० हा स्मार्टफोन आज भारतीय बाजारात दाखल झालाय.
महत्त्वाचं म्हणजे, लेनोवो ए-७००० बाजारात दाखल होण्यापूर्वीच 'फ्लिपकार्ट' या शॉपिंग वेबसाईटवरून लेवोवो ए-६००० हा फोन आऊट ऑफ स्टॉक झालाय. याआधी, ए-६००० हा स्मार्टफोननं बाजारात एकच धुमाकूळ उडवून दिला होता.
ए-7000 चे काही फिचर्स :
ऑपरेटिंग सिस्टम : अँन्ड्रॉईड 5.0 लॉलीपॉप
डिस्प्ले : 5.5 इंचाचा एचडी आयपीएस डिस्प्ले (720 X 1280)
प्रोसेसर : 1.5 गीगाहर्टझ, क्लॉक्ड मीडियाटेक MT6572M
रॅम : 2 जीबी
कॅमेरा : 8 मेगापिक्सल, ऑटोफोकस आणि एईडी फ्लॅशसहीत
फ्रंट कॅमेरा : 5 मेगापिक्सल
इंटरनल स्टोअरेज : 8 जीबी(एक्सपान्डेबल)
इतर फिचर्स : ड्युएल सिमकार्ड, 4G/LTE (FDD ब्रँड 1,3,7,20; TDD बैंड 40), वाय-फाय, जीपीएस/ए-जीपीएस, ब्लूटूथ, माइक्रो-यूएसबी कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स
ए-७००० हा स्मार्टफोन ए-६००० चा अपडेट व्हर्जन आहे. 'ए-६०००'हून थोडा मोठा स्क्रीन, थोडी जास्त स्पेस या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे... आणि महत्त्वाचं म्हणजे, किंमतही ए-६००० हून थोडीच जास्त आहे. अगदी पैसा वसूल असा हा स्मार्टफोन ठरू शकतो. या फोनची भारतात किंमत असेल केवळ ८,९९९ रुपये...
डॉल्वी अॅटमॉस टेक्नॉलॉजीवर आधारीत त्यांचा हा नवीन स्मार्टफोन आहे. ही टेक्नॉलॉजी ए-7000 या स्मार्टफोनमध्ये बिल्ट-इन येते. लेनोवो ए-7000 ड्युएल-सिमला (मायक्रो-सिम) सपोर्ट करतो.
लेनोवोचा हा स्मार्टफोन एमआय, मोटोरोलो, मायक्रोमॅक्स यांच्या याचसारख्या फिचर्सच्या फोन्सला तगडी टक्कर देणार, हे नक्की.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.