सॅमसंगचा ५० हजारांचा फोन मिळतोय अवघ्या अर्ध्या किंमतीत

Updated: Apr 7, 2015, 01:25 PM IST

नवी दिल्ली : भारतातील स्मार्टफोनच्या बाजारातील अग्रेसर कंपनी सॅमसंगनं Galexy S5 हा स्मार्टफोन काही महिन्यांपूर्वी लॉंच केला होता. मात्र सॅमसंगच्या या स्मार्टफोनची जागा आता 'Galexy S6'नं घेतली आहे. जर तुमची Galexy S5 विकत घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही तो आता अवघ्या अर्ध्या किंमतीत विकत घेऊ शकता. 

ज्यावेळी सॅमसंगनं Galexy S5 लॉंच केला होता, त्यावेळी त्याची किंमत ५०,००० पेक्षा जास्त होती. मात्र आता हा स्मार्टफोन केवळ २६,०९९ रुपयात मिळत आहे.

Galexy S5 चे फिचर्स -

1. 5.1 इंचचा फुल एचडी डिस्प्ले 
2.  क्वॉर्ड कोर 1.9 जीएचजेड आणि क्वॉर्ड कोर 1.3 जीएचजेड प्रोसेसर
3. 2GB रॅम 
4. 16GB इंटरनल स्टोरेज तसंच एसडी कार्डनं 128 GBपर्यंत स्टोरेज वाढवू शकतो.
5.  16 मेगापिक्सल कॅमेरा, 2.0 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
6.  28,00 mAhची बॅटरी जी 16 तासांपर्यंत चालू शकते.
7. तसंच Galaxy S5मध्ये फिंगर प्रिंट सेंन्सर , अल्ट्रा पावर सेवर मोड, हार्ट रेट मॉनिटर, एस हैल्थ सारखे फीचर आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.