नोकरी : म्युझिकची आवड असेल तर व्हा इंडियन नेव्हीत भरती

तुम्हाला जर तुमच्या म्युझिकच्या पॅशनसहीत इंडियन नेव्हीमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर... होय इंडियन नेव्हीनं अविवाहीत पुरुष विद्यार्थ्यांसाठी एक संधी उपलब्ध करून दिलीय. इच्छुक उमेदवार २० मेपर्यंत यासाठी आपले अर्ज सादर करू शकतील. 

Updated: Apr 12, 2015, 06:19 PM IST
नोकरी : म्युझिकची आवड असेल तर व्हा इंडियन नेव्हीत भरती title=

मुंबई : तुम्हाला जर तुमच्या म्युझिकच्या पॅशनसहीत इंडियन नेव्हीमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर... होय इंडियन नेव्हीनं अविवाहीत पुरुष विद्यार्थ्यांसाठी एक संधी उपलब्ध करून दिलीय. इच्छुक उमेदवार २० मेपर्यंत यासाठी आपले अर्ज सादर करू शकतील. 

पदाचं नाव : एमआर (म्युझीसियन)
योग्यता : दहावी पास
म्युझिकल पात्रता : म्युझिक थिअरीचा बेसिक अभ्यास, वेस्टर्न क्लासिकलचं प्रॅक्टिकल स्किल याशिवाय स्टिरिंग, की-बोर्ड, ब्रास वाजवता येणं आवश्यक आहे. 

निवड प्रक्रिया : उमेदवारांना अर्जाच्या आधारावर शॉर्ट लिस्ट केलं जाईल. शॉर्टलिस्टेड उमेदवारांना १३-१६ जुलै दरम्यान स्क्रिनिंग टेस्टसाठी बोलावण्यात येईल. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना मेडिकल टेस्ट द्यावी लागेल.

मेडिकल स्टँडर्ड
- उमेदवारांची उंची १५७ सेमी असायला हवी
- आयसाईट नेव्हीच्या नियमांनुसार असावी
- ज्या उमेदवारांना आर्म्ड फोर्सेसच्या मेडिकल टेस्टमध्ये नापास करण्यात आलंय असे उमेदवार हा अर्ज भरण्यासाठी पात्र नाहीत

पगार
५,२०० ते २०,२००

अधिक माहितीसाठी www.joinindiannavy.gov.in या वेबसाईटवर जा.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.