मुंबई : आतापर्यंत लोकांना रिलायंस जिओचं सिम वापरतांना इंटरनेटची स्पीड ही सगळ्यांचीच तक्रार होती. पण आता असं नाही होणार. कारण रिलायंस जिओच्या नेटवर्कवर आता डाउनलोड स्पीड जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून दुप्पट झाली आहे. जिओची स्पीड आता 17.42 मेगाबाईट प्रती सेकंड (एमबीपीएस) झाली आहे.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने ही माहिती दिली आहे. तर डाउनलोड स्पीडच्या बाबतीत आयडिया दुसऱ्या तर एअरटेल तीसऱ्या क्रमांकावर आहे.
ट्राईने प्रकाशित केलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, जानेवारीमध्ये जिओच्या नेटवर्कची डाउनलोड स्पीड 17.42 मेगाबाईट झाली. डिसेंबरच्या शेवटपर्यंत ती 8.34 मेगाबाईट होती. या स्पीडमध्ये एखादा सिनेमा ३० मिनिटांच्या आता डाऊनलोड केला जाऊ शकतो.
इतर कंपन्यांचा स्पीड
आयडिया 8.53 एमबीपीएससह दुसऱ्या स्थानावर आहे. डिसेंबरच्या शेवटपर्यंत त्याची स्पीड 6.6 एमबीपीएस होती.
एअरटेल नेटवर्कची डाऊनलोड स्पीड 8.42 एमबीपीएसवरुन 8.15 एमबीपीएसवर आली आहे.
वोडाफोन नेटवर्कवर डाऊनलोड स्पीड 6.8 एमबीपीएसहून 6.13 एमबीपीएस झाला आहे.
बीएसएनएलची डाऊनलोड स्पीड 3.16 एमबीपीएसवरुन 2.89 एमबीपीएस झाली आहे.