टिंडर : लफडं नाही, प्रेमाचं, मैत्रीचं नवं ठिकाणं

टिंडर हे काही लफडं बाजीचं प्रकरण नाहीय, हे प्रेमाचं प्रकरण आहे, असं म्हणावं लागेल, कारण टिंडर अॅप डाऊनलोड करण्यात महिला आघाडीवर आहेत. टिंडर हे एक डेटिंग अॅप आहे, टिंडरची लोकप्रियता एवढी आहे की, त्याचा महसूल फेसबुकच्या खालोखाल येऊन पोहोचलाय.

Updated: Dec 14, 2015, 06:31 PM IST
टिंडर : लफडं नाही, प्रेमाचं, मैत्रीचं नवं ठिकाणं title=

मुंबई : टिंडर हे काही लफडं बाजीचं प्रकरण नाहीय, हे प्रेमाचं प्रकरण आहे, असं म्हणावं लागेल, कारण टिंडर अॅप डाऊनलोड करण्यात महिला आघाडीवर आहेत. टिंडर हे एक डेटिंग अॅप आहे, टिंडरची लोकप्रियता एवढी आहे की, त्याचा महसूल फेसबुकच्या खालोखाल येऊन पोहोचलाय.

रुढीवादी देशांमध्येही महिलांनी टिंडरला आपलंस केलंय, टिंडरवर पुरूषांपेक्षा महिला जास्त वेळ घालवतात. सारख्या आवडी निवडी अथवा एकमेकांच्या आवडीनिवडी पाहून टिंडरवर अनेकांची मनं जुळत असल्याचं सांगण्यात येत आहे.

१० लाखांपेक्षा अधिक लाईक भारतीयांकडून दर महिन्याला या अॅपला मिळतायत. एक युझर हे अॅप्लिकेशन दिवसभरातून अकरा वेळेस वापरतो. ५ कोटी लोकांनी हे अॅप वापरलंय, तर भारतात मागील वर्षाच्या तुलनेत हे अॅप वापरणाऱ्यांची संख्या ४०० टक्क्यांनी वाढलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.