तुमचे नाव B लेटरपासून सुरु होते का?

अंक ज्योतिषानुसार इंग्रजीचे दुसरे अक्षर बी पासून सुरु होणाऱ्या नावाच्या व्यक्तींचा मूलांक २ असतो. यांची रास कर्क असते तर स्वामी चंद्र असतो. 

Updated: Mar 9, 2016, 11:25 AM IST
तुमचे नाव B लेटरपासून सुरु होते का? title=

मुंबई : अंक ज्योतिषानुसार इंग्रजीचे दुसरे अक्षर बी पासून सुरु होणाऱ्या नावाच्या व्यक्तींचा मूलांक २ असतो. यांची रास कर्क असते तर स्वामी चंद्र असतो. 

ज्यांचे नाव बी अक्षरापासून सुरु होते त्यांच्यावर कर्क राशी आणि चंद्राचा अधिक प्रभाव असतो. अशा व्यक्ती मूडी असतात. यांना कोणत्याही प्रकारचा दबाव टाकलेला आवडत नाही. लहान लहान गोष्टींवर अशा व्यक्ती खुश होतात.

यांना फारसे मित्र नसतात. मात्र ज्यांच्याशी हे मैत्री करतात त्यांच्याशी ईमानदारीने मैत्री निभावतात. यांच्यात कामभावना अधिक असते. 

ज्यांचे नाव बी अक्षरापासून सुरु होते अशा व्यक्ती खासकरुन प्रेमविवाह करतात. या व्यक्ती मेहनती असतात. त्यामुळेच यांची आर्थिक स्थिती चांगली असते. भावुक असतात. गरजूंना मदतीसाठी या व्यक्ती सदैव तत्पर असतात. सामाजिक कार्यांमध्ये भाग घेण्याची या व्यक्तींना आवड असते.