अॅपलच्या आयफोन ६एस आणि ६एस प्लसच्या किंमतीत कपात

अॅपलने आपल्या नव्या आयफोन ६एस आणि ६एस प्लसच्या किंमतीत तब्बल १६ टक्क्यांनी कपात केलीय. हे दोन्ही फोन दोन महिन्यांपूर्वीच लाँच करण्यात आले होते. 

Updated: Dec 21, 2015, 01:35 PM IST
अॅपलच्या आयफोन ६एस आणि ६एस प्लसच्या किंमतीत कपात title=

नवी दिल्ली : अॅपलने आपल्या नव्या आयफोन ६एस आणि ६एस प्लसच्या किंमतीत तब्बल १६ टक्क्यांनी कपात केलीय. हे दोन्ही फोन दोन महिन्यांपूर्वीच लाँच करण्यात आले होते. 

दिवाळीमध्ये या स्मार्टफोन्सना चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र त्यानंतर विक्रीत घट झाल्याने कंपनीने हा निर्णय़ घेतलाय. आयफोन ६एस १६ जीबी मॉडेल भारता ६२ हजार रुपयांना लाँच करण्यात आला होता. एका वेबसाईटनुसार या आयफोनची किंमत कमी होऊन ती ५२ हजार ते ५५ हजारावर पोहोचलीये. अॅपलने दोन्ही फोनच्या १६, ६४ आणि १२८ जीबी मॉडेलच्या दरात कपात केलीये. 

भारतात अॅपलने आयफोन ६एस आणि ६ एस प्लसच्या किंमती ६२ हजार ते ९२ हजारादरम्यान ठेवल्या होत्या. भारतात या कंपनीने अमेरिका, मिडल ईस्ट, सिंगापूर आणि हागकाँगच्या तुलनेत १४ हजार ते १६ हजार अधिक रुपयांनी लाँच केले होते. लाँचनंतर अवघ्या दोन महिन्यात फोनच्या किंमती घटवण्याची ही पहिलीच वेळ आहे.