नवी दिल्ली : सोशल नेटवर्किंग साइट असलेल्या फेसबुकवर सर्वाधिक लोकप्रिय होण्याचा मान भारतीय लष्करानं दुसर्यांदा पटकावला आहे. सीआयए, एफबीआय, नासा यासारख्या नामांकित विदेशी सरकारी संस्थांच्या फेसबुक पेजला मागे टाकत भारतीय लष्कराने आपल्या फेसबुक पेजवर तब्बल २९ लाख लाइक्स मिळविले आहेत.
१ जून २०१३ साली भारतीय लष्कराने आपले स्वतंत्र फेसबुक अकाऊंट बनवलं. त्याला आतापर्यंत २९ लाख लाइक्स मिळाले आहेत. 'पिपल टॉकिंग अबाउट दॅट'च्या रॅकिंगमध्ये भारतीय सैन्याचं फेसबुक पेज टॉपवर आहे.
दोन वर्षात हिट झालं सैन्याचं पेजला
पीटीएटी रँकिंगच्या कोणत्याही खास पेजवर त्याच्याबद्दल चर्चा करणाऱ्यांच्या संख्येवरून विश्लेषणावर आधारित असते. भारतीय सैन्याची ही उपलब्धी केवळ फेसबुक पेजवर नाही तर सैन्याच्या अधिकृत वेबसाइटवर सुद्धा प्रत्येक आठवड्याला कमीतकमी २५ लाख हिट्स मिळतात.
सोशल मीडियावर भारत-पाक युद्ध
विशेष बाब म्हणजे फेसबुक पेजवर भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्ध सुरू आहे. दोन्ही पेजने जिओ लोकेशनद्वारे एकमेकांचं अकाऊंट ब्लॉक केलंय. याचा अर्थ पाकिस्तानातील कोणताही व्यक्ती भारतीय सैन्याचं फेसबुक पेज ओपन करू शकणार नाही आणि कोणताही भारतीय व्यक्ती पाकिस्तानचं फेसबुक पेज उघडू शकणार नाही.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतीय सैन्याचं ट्विटर अकाऊंटचेही चार लाख ४७ हजार फॉलोअर आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.