भारतात इंटरनेटचा स्पीड सर्वात स्लोः अकामाई

भारतात इंटरनेट स्पीड जगाच्या तुलनेत सर्वात कमी आहे, असे एका अहवालात समोर आले आहे.  इंटरनेट कन्टेंट डिलिवरी नेटवर्क म्हणजेच अकामाईने नुकताच आपला तिमाही अहवाल प्रसिद्ध केला त्यात भारतात इंटरनेट कनेक्शनचा सरासरी स्पीड १.७ एमबीपीएस आहे. भारत यात जगात ११८ व्या रँकिंगवर असून थायलंड, इंडोनेशिया, फिलिपिन्स आणि व्हिएतनामपेक्षाही मागे आहे.

Updated: Jul 2, 2014, 05:53 PM IST
भारतात इंटरनेटचा स्पीड सर्वात स्लोः अकामाई title=

मुंबई : भारतात इंटरनेट स्पीड जगाच्या तुलनेत सर्वात कमी आहे, असे एका अहवालात समोर आले आहे.  इंटरनेट कन्टेंट डिलिवरी नेटवर्क म्हणजेच अकामाईने नुकताच आपला तिमाही अहवाल प्रसिद्ध केला त्यात भारतात इंटरनेट कनेक्शनचा सरासरी स्पीड १.७ एमबीपीएस आहे. भारत यात जगात ११८ व्या रँकिंगवर असून थायलंड, इंडोनेशिया, फिलिपिन्स आणि व्हिएतनामपेक्षाही मागे आहे.

अकामाईच्या अहवालानुसार भारतात दर तीन महिन्यांनी इंटरनेटचा स्पीड ८.४ टक्क्यांनी वाढत आहे. वर्षभरात तो २४ टक्क्यांनी वाढतो.  अकामाईने या अहवालात अशा युजर्सचा समावेश केला की जे ४ एमबीपीएस पेक्षा अधिक स्पीड मिळवत आहेत.

भारतात एकूण इंटनेट युजर्सपैकी केवळ ०.७ टक्के युजर्स १० एमबीपीएस पेक्षा अधिक स्पीडने इंटरनेटचा वापर करतात. तर ४.९ टक्के युजर्स ४ एमबीपीएसपेक्षा अधिक स्पीड वापरतात. अकामाईनुसार १० एमबीपीएसचा स्पीड हाय ब्रॉडबँड असतो.

इंटरनेटचा ग्लोबल सरासरी स्पीड ३.९ एमबीपीएस आणि सर्वाधिक सरासरी कनेक्शन स्पीड २१.२ एमबीपीएस आहे.  तर भारतात सरासरी सर्वाधिक कनेक्शन स्पीड १२ एमबीपीएस आहे.

सरासरी स्पीडच्या बाबतीत दक्षिण कोरिया २३.६ एमबीपीएस आहे तर सर्वाधिक पीक कनेक्शन ६८.५ एमबीपीएस आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.