तुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर स्क्रॅच पडले असतील तर...

तुमच्या स्मार्टफोनवर चुकून पाणी पडलं किंवा धूळ साचली असेल आणि तुम्हाला तो साफ करायचा असेल तर आम्ही सांगतोय तुम्हाला काही सोप्या टीप्स... 

Updated: Feb 1, 2015, 09:02 PM IST
तुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर स्क्रॅच पडले असतील तर... title=

नवी दिल्ली : तुमच्या स्मार्टफोनवर चुकून पाणी पडलं किंवा धूळ साचली असेल आणि तुम्हाला तो साफ करायचा असेल तर आम्ही सांगतोय तुम्हाला काही सोप्या टीप्स... 

तुमच्या स्मार्टफोनची समस्या दूर करायची असेल तर तुम्ही अल्कोहोलचा वापर करू शकता. इतकंच नाही तर, तुमच्या मोबाईलच्या की-पॅडची बटणं जाम झाली असली तरीदेखील ती मोकळी करण्यासाठी अल्कोहोल उपयोगी ठरू शकतं. 

तुमच्याकडे की-बोर्ड असणारा एखादा मोबाईल असेल किंवा फूल टच स्क्रीनच्या जागेवर होम बटन असेल किंवा सोनी सीरिजचा एखादा मोबाईल तुम्ही वापरत असाल ज्यामध्ये मेटॅलिक पॉवर बटन दिलेली असेल तर अल्कोहोल यासाठी महत्त्वाचं काम करू शकतं. अल्कोहोलच्या साहाय्यानं तुम्ही केवळ स्मार्टफोनच नाही तर कम्प्युटरचा की-बोर्ड, माऊस, फोनची केस किंवा बॅटरी साफ करू शकता. 

कसं साफ कराल?

- थोडा कापूस घ्या... एक काडी घ्या... आणि त्या काडीवर कापूस गुंडाळून घ्या.

- काडीला गुंडाळलेला कापूस दोन थेंब अल्कोहोलमध्ये टाकून दोन मिनिटं बाहेर काढून ठेवा. 

- त्यानंतर, हलक्या हातांनी आपल्या गॅजेटसला स्क्रब करून साफ करा.  

- जास्त प्रेशर टाकल्यास अल्कोहोल गॅजेट आत जाण्याची शक्यता आहे.... तेवढं सांभाळून 

- हलक्या हातांनी साफ-सफाई केल्यानंतर साफ कपड्यानं पुसून घ्या.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.