खुशखबर : 'मॅकडॉनल्ड'मध्ये बिलाला सुट्टी!

मॅकडॉनल्डमध्ये तुम्ही काहीही खायला गेलात तर तुम्हाला बील भरण्यापासून सुट्टी मिळू शकते... होय, २ फेब्रुवारीपासून मॅकडॉनल्डमध्ये बील भरण्याऐवजी फक्त सेल्फी काढून किंवा जादू की झप्पी देऊ शकता.

Updated: Feb 1, 2015, 08:34 PM IST
खुशखबर : 'मॅकडॉनल्ड'मध्ये बिलाला सुट्टी! title=

नवी दिल्ली : मॅकडॉनल्डमध्ये तुम्ही काहीही खायला गेलात तर तुम्हाला बील भरण्यापासून सुट्टी मिळू शकते... होय, २ फेब्रुवारीपासून मॅकडॉनल्डमध्ये बील भरण्याऐवजी फक्त सेल्फी काढून किंवा जादू की झप्पी देऊ शकता.

'लवइन' नावाच्या या नव्या कॅम्पेनमध्ये जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहचण्याचा पयत्न मॅकड़ी करतंय. विशेष म्हणजे, काही निवडक ग्राहकांनाच ही संधी मिळणार आहे. आपलं बील कॅश किंवा कार्डातून करण्याऐवजी या ग्राहकांना 'लवइन'द्वारे आपलं पेमेंट करता येणार आहे. यामध्ये, ग्राहकांना केवळ एक सेल्फी, आलिंग किंवा हाई-फाइव्ह करायला लागेल.

'मॅकडी'च्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेल्फी, हाई फाईव्हसारख्या असे अनेक प्रकार आमच्याकडे आहेत ज्याद्वारे ग्राहक आपलं बील भरू शकतील. 'लवइन' म्हणजे ग्राहकांचे आभार मानण्याचा आमचा एक प्रयत्न आहे, असंही त्यांनी म्हटलंय. 

अगोदरच, निश्चित केलेल्या कालावधीत जर एखाद्या ग्राहकानं मॅकडीमध्ये ऑर्डर केली तर तो या डीलचा भाग बनू शकेल. मॅकडीचे कर्मचारी ग्राहकांना ते 'पे विथ लवइन'चा भाग आहेत किंवा नाहीत, याची माहिती देतील. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.