नवी दिल्ली : गूगलनं आपला बहुचर्चित स्मार्टफोन नेक्सस-६ भारताच्या बाजारात उतरवलाय. आजपासून (बुधवार) हा भारतीय बाजारात उपलब्ध होणार आहे.
कंपनीनं आपल्या वार्षिक ग्रेट ऑनलाईन शॉपिंग फेस्टिव्हल (जीओएसएफ) दरम्यान या स्मार्टफोनला विशेष रुपात लॉन्च केलं. हे आयोजन १०-१२ डिसेंबरपर्यंत होणार आहे.
कंपनीनं जीओएसएफ – २०१४ मध्ये ‘क्रोमकास्ट’ही लॉन्च केलंय. याची किंमत २९९९ रुपये निर्धारित करण्यात आलीय. कंपनीनं लेनोवा, एशियन पेंटस, टाटा हाऊसिंग आणि वेन ह्युसनचे काही उत्पादनही विशेष रुपात लॉन्च केलेत.
गूगल इंडियाचे कार्यकारी संचालक राजन आनंदन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जीओएसएफ’चं पहिलं वर्जन २०१२ मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. यामध्ये ९० मर्चंट सहभागी झाले होते. तर यावर्षी हीच संख्या ४५० पर्यंत पोहचली. भारतात लोकांचा ऑनलाईन शॉपिंगवर विश्वास वाढायला लागलाय.
गूगलच्या म्हणण्यानुसार देशभरात ऑनलाईन खरेदी वाढविण्याच्या हेतून ‘जीओएसएफ’ची सुरुवात करण्यात आलीय.
नेक्सस-६ची विक्री फ्लिपकार्टवर होणार आहे. या स्मार्टफोनची किंमत आहे ४३,९९९ रुपये (३२ जीबी) तसंच ४८,९९९ रुपये (६४ जीबी)... क्रोमकास्टसाठी कंपनीनं भारती एअरटेल आणि स्नॅपडीलशी हातमिळवणी केलीय.
नेक्सस ६ ची वैशिष्ट्ये...
- ५.९६ इंचाचा डिस्प्ले
- अँड्रॉईड लॉलीपॉप ५.०
- १३ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा
- दोन मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.