देहरादून : धार्मिक भावना भडकावण्यासाठी 'व्हॉटसअप'वर मॅसेज धाडणाऱ्याबद्दल आता 'गूगल' माहिती देणार आहे.
एका प्रकरणात कोतवाली पोलिसांनी कॅलिफोर्निया स्थित गूगल कंपनीकडून डाटा मागविला आहे.
नुकताच, व्हॉटसअपवरून व्हायरल झालेल्या एका फोटोतून धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न झाला होता. हिंदू संघटनांनी याविरोधात कोतवालीमध्ये जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतर पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचा मोबाईल जप्त करून चौकशी सुरू केलीय. यामध्ये पोलिसांना, धार्मिक भावना भडकावणारे काही मॅसेजेस तसंच काही अश्लील फोटोही सापडले आहेत. या आरोपींना नोटीस देऊन त्यांना सोडून दिलं होतं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॉटसअपवरून हा फोटो कोणत्या मोबाईलवरून धाडण्यात आला होता याची माहिती गूगल देणार आहे. त्यानंतर या प्रकरणात दोषींविरुद्ध आरोप दाखल केले जातील.
उल्लेखनीय म्हणजे, याच वादग्रस्त फोटोवर काशीपूर आणि पिथोरागड तक्रार दाखल करण्यात आलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.