गुगल मॅप आता पार्किगसाठी जागा ही सांगणार

ड्राईव्ह करत असतांना आता गाडी थांबवून रस्ता विचारण्याचे दिवस गेलेत असं म्हणायला काही हरकत नाही. याचं कारण आहे गुगल मॅप. गुगल मॅपमुळे आता कोठेही जाणं सहज शक्य जाणार आहे. पण आता तुम्हाला रस्ता दाखवणारा गुगल तुमच्या गाडीला तेथे पार्किंगसाठी जागा आहे की नाही ते देखील सांगणार आहे. गुगलमुळे कोणतीही गोष्ट सहज शोधू शकता आता पार्किंगही तुम्हाला शोधता येणार आहे. गुगल मॅपच्या मदतीने एखाद्या ठिकाणी पार्किंगसाठी जागा आहे की नाही हे देखील शोधता येणार आहे.

Updated: Jan 19, 2017, 10:07 PM IST
गुगल मॅप आता पार्किगसाठी जागा ही सांगणार title=

मुंबई : ड्राईव्ह करत असतांना आता गाडी थांबवून रस्ता विचारण्याचे दिवस गेलेत असं म्हणायला काही हरकत नाही. याचं कारण आहे गुगल मॅप. गुगल मॅपमुळे आता कोठेही जाणं सहज शक्य जाणार आहे. पण आता तुम्हाला रस्ता दाखवणारा गुगल तुमच्या गाडीला तेथे पार्किंगसाठी जागा आहे की नाही ते देखील सांगणार आहे. गुगलमुळे कोणतीही गोष्ट सहज शोधू शकता आता पार्किंगही तुम्हाला शोधता येणार आहे. गुगल मॅपच्या मदतीने एखाद्या ठिकाणी पार्किंगसाठी जागा आहे की नाही हे देखील शोधता येणार आहे.
 
गुगल मॅप्सचे व्ही.9.44 बेटा व्हर्जन वापरणाऱ्या युजर्सना ही सुविधा मिळणार आहे. लवकरच सर्व युजर्ससाठी ही ती उपलब्ध होणार आहे. काही ठराविक ठिकाणीच ही सुविधा सुरुवातीला मिळणार आहे. अॅपमध्ये लिमिटेड, मीडियम आणि इझी असे तीन प्रकार आहेत. "पी' या नव्या आयकॉनसमोर हे फ्लॅश होणार असून तेथे पार्किंगसाठी जागा आहे की नाही ते दिसणार आहे. ही सुविधा मॉल्स, विमानतळ आणि प्रेक्षणीय स्थळांवर उपलब्ध असणार आहे.

गुगल मॅपवरून तुम्ही उपहारगृह, पेट्रोल पंप, एटीएम, कॉफी शॉप्स, मेडिकल्स, सुपर मार्केट, हॉटेल्स, पब्स आणि बार, डीपार्टमेंट स्टोअर, पोस्ट ऑफिस हे देखील शोधता येणार आहे.