मुंबई : फ्री डाटा आणि फ्री कॉलची रिलायन्सची हॅप्पी न्यू इअर ऑफर ३१ मार्च रोजी संपुष्टात येणार आहे. यानंतर रिलायन्सचा प्लान काय असेल? याची उत्सुकता ग्राहकांसोबतच प्रतिस्पर्धी कंपन्यांनाही लागून राहिलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी ३१ मार्चनंतर तीन महिन्यांसाठी अत्यंत कमी दरात डेटा सर्व्हिस देणार आहे. यासाठी एका टेरिफ प्लानवरही काम सुरू आहे. हा टेरिफ प्लान १ एप्रिल ते ३० जूनपर्यंत लागू राहील.
'आज तक'नं दिलेल्या बातमीनुसार, टेरिफ प्लानमध्ये डाटा सर्व्हिससाठी ग्राहकांकडून १०० रुपये चार्ज वसूल केला जाऊ शकतो. तर व्हॉईस कॉल मात्र पूर्वीप्रमाणेच फ्री राहील.
रिलायन्सच्या धमाकेदार प्लान्समुळे सध्या मार्केटमध्ये जिओचाच बोलबाला आहे... प्रतिस्पर्धी कंपन्यांनी मात्र याचा जोरदार धसका घेतलाय. रिलायन्स जिओशी आत्तापर्यंत ७ करोडहून अधिक ग्राहक जोडले गेलेत.